Join us

मांड्यांवर सुरकुत्या दिसतात? त्वचा ओढली जाते? कारणे आणि उपाय जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2025 14:05 IST

do you have Wrinkles on the thighs? The skin is stretched? Know the causes and solutions : पायावर सुरकुत्या आहेत? पाहा काय कारण असू शकते आणि काय उपाय करावा लागेल.

महिलांमध्ये मांड्या जाड असणे ही गोष्ट अगदी नैसर्गिक आहे. शरीराने अगदी बारीक असणाऱ्या मुलींच्याही मांड्या जाड असू शकतात. त्यामुळे फक्त वजन जास्त असणाऱ्या मुलींच्याच मांड्या मोठ्या नसतात. मांड्यांवर अनेकदा स्ट्रेच मार्क्स असतात. (do you have Wrinkles on the thighs? The skin is stretched? Know the causes and solutions)तसेच मांड्यांना सुरकुत्या पडल्यासारखे जाणवते. रेषा तयार झालेल्या असतात आणि त्यावर त्वचा फुगलेली दिसते. तसेच पाय फार विचित्र दिसतो. या सुरकुत्या का येतात आणि कशा कमी करता येतील असा प्रश्न मुलांना पडलेला असतो. तरुण वयातच मांड्या लटकताना दिसतात असे जाणवते.  जाड मांड्यांवर सुरकुत्या येण्याची अनेक कारणे असू शकतात. या सुरकुत्या येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्वचेचे होणारे घर्षण. मांड्या जाड असल्यामुळे एकमेकांवर घासल्या जातात. त्यामुळे खाजही येते आणि रॅशही उठतात. तसेच मांड्यांवर सुरकुरत्या तयार होतात. आणखी एक कारण म्हणजे कोरडेपणा. काहींची मांडीजवळ त्वचा जास्त कोरडी असते. त्यामुळेही असा त्रास होतो. वजन वाढल्यामुळे मांड्या बेढब दिसायला लागतात. मास फार वाढते त्यामुळे सुरकुत्या दिसतात. ही काही सामान्य कारणे आहेत.

जर तुमचे वजन फार आहे तर तुम्हाला वजन कमी करणे हाच उपाय करावा लागेल. वजन कमी झाल्यावर मांड्यांचे मास कमी होईल. त्यामुळे मांड्या पुन्हा मऊ दिसायला लागतील. इतरही कारणे असू शकतात. मात्र वजन कमी करणे हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. वयाच्या आधी सुरकुत्या फक्त जास्तीच्या वजनामुळेच दिसतात. 

मांड्यांना नारळाच्या तेलाने मालीश करायचे. मांड्यांवर तेल लावल्यामुळे सुरकुत्या सुटतात त्वचेला शितलता मिळते. ओलावा निर्माण होतो. कोरडेपणामुळे होणारे सगळे त्रास बंद होतात. हातावर तेल घ्यायचे आणि छान चोळायचे. या सुरकुत्या खरे तर फक्त एकवटलेले मास असते. त्यामुळे ते तेलाच्या मालीशने मोकळे होते.  

    त्वचा जास्त घट्ट झाल्यामुळेही सुरकुत्या तयार होतात. दही व बेसनाचा लेप मांड्यांना लावत जा. मांड्यांची त्वचा मऊ होईल. त्वचा मऊ झाल्यावर एकवटलेली त्वचा मोकळी होईल. घट्टपणा कमी होईल. मांड्यांना सुरकुत्या येण्यामागे इतरही काही कारणे असू शकतात. फारच विचित्र दिसत असेल तर वेळीच वैद्यांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.  

टॅग्स : आरोग्यब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स