डोकेदुखीचा त्रास अनेकांना सतत सतावत असतो. त्यातून त्वरित आराम मिळण्यासाठी औषधे घेण्याऐवजी साधे घरगुती उपाय करणे जास्त फायद्याचे ठरते. अनेक कारणांमुळे डोकं दुखतं. (Do you have a headache? Causes of a heavy head and ways to stop headaches)पित्ताचा त्रास असेल किंवा झोपेचा अभाव डोकं लगेच दुखायला लागतं. आजकाल मोबाइल, लॅपटॉप पाहण्याचे प्रमाण खुप जास्त आहे त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोकंही दुखतं. काही साधे उपाय आहेत जे केल्याने डोकं दुखायचं थांबेल.
१. कोमट पाण्यात अर्धा लिंब पिळायचा. असे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. पचनासाठी मदत होते आणि अपचनामुळे जर डोकं दुखत असेल तर आराम मिळतो. पोटातील गॅस कमी होतो आणि काही वेळातच डोकेदुख थांबते.
२. पेपरमिंट ऑइल डोकेदुखीवर अगदी प्रभावी असते. पेपरमिंटमधील मेन्थॉलमुळे रक्तवाहिन्या खुल्या होतात आणि थंडावा मिळतो. डोक्याला तेलाने चंपी करायची म्हणजे डोकं दुखणं थांबेल.
३. आलं आणि मध गरम पाण्यात घालायचे आणि प्यायचे. आल्याचे पाणी फार फायद्याचे ठरेल. तसेच आल्याचा किंवा सुंठीचा चहाही उपयुक्त ठरतो.
४. लवंग गरम करून रुमालात बांधून त्याचा वास घेणे किंवा तेलात लवंग गरम करुन त्या तेलाचा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. हा घरगुती उपाय वर्षानुवर्षे चालत आला आहे.
५. शरीरातील कॅफेनचे प्रमाण जास्त झाल्यावरही डोकं दुखतं. त्यामुळे शरीरातील कॅफेनचे प्रमाण योग्य राहील एवढेच खावे. संतुलित ठेवा.
६. महिला अनेकदा केस धुतल्यावर ओले केस बांधतात. ओले केस बांधल्यामुळे डोकं प्रचंड दुखतं आणि केसांना वासही घाण येतो. त्यामुळे ओले केस अजिबात बांधू नका. पोकळीत केस व्यवस्थित वाळले की मग केस बांधायचे.
७. डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. त्यामुळे दिवसभरात शरीराला जेवढे गरजेचे आहे तेवढे पाणी पिणे फार महत्त्वाचे असते. पाण्यात तुळस घालायची आणि तुळस पाणी प्यायचे. जास्त फायद्याचे ठरेल.
८. झोपेचे प्रमाण कमी जास्त झाल्यावर दिवसभर डोकं जड होतं. अति झोप चांगली नाही आणि अभावही. त्यामुळे झोप संतुलित असावी. लवकर झोपायचे आणि वेळेत उठायचे. असे केल्याने डोकेदुखीचे प्रमाण कमी होईल.