पोट जर सुखी असेल तरच आपण सुखी असतो. पोटाची काही गडबड झाली की मग फारच त्रास होतो. (Do you have a bloated stomach? Don't ignore the problem of bloating, eat 'these' foods and your digestion will be smooth.)मग अपचन असो किंवा इतर कोणता त्रास. पोट रोज सकाळी व्यवस्थित साफ होणे गरजेचे असते. दिवसभर तसेच राहणे जास्त गरजेचे असते. कधी तरी जेवणानंतर किंवा अचानकच पोट फुगते श्वास घेतानाही त्रास होतो साधे पाणी प्यायले तरी ढवळते.
काहींना वरचेवर ब्लोटींग होतच असते मात्र सतत ब्लोटींग होणे आरोग्यासाठी चांगले नाही. पचनक्रिया सुरळीत नसल्याचे ते लक्षण आहे. पाळीच्या दिवसांमध्ये ब्लोटींग होतो मात्र ते इतर वेळीही तसेच होत असेल तर काही तरी उपाय करायलाच हवेत.
सतत पुट फुगणं चांगलं नाही. (Do you have a bloated stomach? Don't ignore the problem of bloating, eat 'these' foods and your digestion will be smooth.)त्या मागे अनेक कारणं असतात. पाळीच्या दिवसांमध्ये ब्लोटींग होते काही अरवटचरवट खाल्यावर ब्लोटींग होतं. जागरणामुळेही पोट बिघडते आणि ब्लोटींग होते. सगळ्या समस्यांचे मुळ आहारात असते. त्यामुळे योग्य पदार्थांचा आहारात समावेश केल्याने ब्लोटींगची समस्याही कमी करता येईल. ब्लोटींग टाळण्यासाठी काही पदार्थ खाणे उपयुक्त ठरते.
१. पचनासाठी आलं फार फायदेशीर असते. ब्लोटींग होऊ नये यासाठी रोज आल्याचा रस प्या. जिंजर टी म्हणजेच आल्याचा चहा प्यायचा. पचनही सुधारेल.
२. दही प्रोबायोटीक असते. त्यातील गुड बॅक्टेरियामुळे पचन सुधारते आणि पोट फुगत नाही. तसेच वजन कमी करण्यासाठीही मदत होते.
३. पेपरमिंटची गोळी आपण मज्जा म्हणून लहानपणी खायचो मात्र पेपरमिंट पचनासाठी चांगले असते. पेपेरमिंट टी प्यायल्याने गॅस होत नाही तसेच पोट फुगण्याची समस्या बंद होते.
४. जिऱ्याचे पाणी नेमाने पित जा. रोज एक ग्लास जिऱ्याचे पाणी प्यायचे. गरम पाण्यात जिरे उकळवायचे आणि प्यायचे. आहारासाठी चांगले असते.
५. हिंग पोटाला लावायचे. पोटाला लगेच आराम मिळतो. पोटाला आत अडकलेल्या हवेमुळे फुगवटा येतो. हिंग हवा खेचून काढते त्यामुळे ब्लोटींग कमी होते.
६. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी. रोज भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी कमी प्यायल्याने पचन चांगले होत नाही. पचन नीट झाले नाही तर इतर समस्या सुरू होतात. अपचन झाल्यामुळेच पोट फुगते तसेच पोट साफ होत नाही. त्यामुळे रोज योग्य तेवढे पाणी पिणे गरजेचे आहे.