Join us

घामामुळे मांड्या घासून रॅश येते? साधे चालायचेही वांदे होऊन जातात? मग हे ३ पर्याय तुमच्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2025 20:42 IST

Do you get a rash on your thighs due to sweat? then try this : मांड्या काचणे ही फारच कॉमन समस्या आहे. पाहा काय उपाय कराल.

उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतात. सतत घाम येतो. घशाला कोरड पडते. (Do you get a rash on your thighs due to sweat? then try this)उन्हामुळे चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते. शरीर सारखं डिहायड्रेटेड होते. ओठांनाही सारखी कोरड पडते. चेहरा अगदी करपून निघतो. अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो. एक त्रास उन्हाळ्यात असाही होतो, ज्यामुळे चालायचेच वांदे होऊन जातात. (Do you get a rash on your thighs due to sweat? then try this)हा प्रकार म्हणजे मांड्या कचणे. आपण दिवसभर बाहेर असलो की घाम येत राहतो. आलेला घाम जनेंद्रियांजवळ साठतो. तो तसाच साठून राहिल्याने मग मांड्यांजवळ लाल- लाल चट्टे पडतात. 

मांडीला पुरळ येते. सतत खाज सुटत राहते. खाजवल्याशिवाय स्वस्थता मिळत नाही आणि खाजवल्यावर त्यातून रक्त यायला लागते.  हा त्रास जाड मांड्या असणार्‍या महिलांमध्ये जास्त उद्भवतो. (Do you get a rash on your thighs due to sweat? then try this)मांड्यांचे घर्षण झाल्याने तेथील त्वचा घासली जाते आणि मग रॅश येतात. काही सोपे व साधे असे उपाय आहेत, जे केल्याने मांड्यांना होणारा हा त्रास टाळता येतो.

१. उन्हाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात घाम येतो. तो घाम पुन्हा शरीरामध्ये मुरतो. (Do you get a rash on your thighs due to sweat? then try this)घरी असताना हा घाम सतत पुसणे किंवा पाण्याने शरीर स्वच्छ करणे शक्य होते. मात्र दिवसभर कामानिमित्त बाहेर असणार्‍यांना हा घाम साफ करता येत नाही. तो तसाच राहतो. जर शरीरापाशी हवा खेळती राहिली तर,  घाम त्रासदायक ठरत नाही. त्यामुळे सैल सुटसुटीत असे कपडे वापरायचे. जाड कापड असलेले कपडे वापरायचे नाहीत. पातळ कापडाचेच कपडे वापरा. हवा खेळती राहिली की त्रास होणार नाही.

२. अंघोळ केल्यावर शरीर व्यवस्थित कोरडे करून घ्यावे. मग सर्वच अवयवांना पावडर लावावी. पावडर लावल्याने शरीरवर रॅश उठत नाही. 

३. मांडी काचल्यावर मांडीला खोबरेल तेल लावावे. घासून घासून त्वचा कोरडी झाली असते. खोबरेल तेलामुळे मांड्यांना हाव असणारा थंडावा मिळतो. रात्री झोपतानाही मांड्यांना तेल लावायचे. मांड्या मोकळ्या ठेऊन झोपायचे. सकाळपर्यंत रॅश नक्कीच गायब होईल. 

४. जर तुम्हाला खुपच घाम येत असेल तर, कामावरून घरी आल्यावर जरा कोमट पाण्याने अंघोळ करा. शरीरातील उष्णताही कमी होईल आणि घामही धुतला जाईल.  

टॅग्स : आरोग्यत्वचेची काळजीहोम रेमेडी