अनेक महिलांना थोडीशी शारीरिक हालचाल केली तरीही दम लागतो किंवा श्वास घ्यायला त्रास होतो. (Do you feel tired for no reason? can't breathe after walking few steps ? see the reasons )काही वेळा कोणताही गंभीर आजार नसतानाही असे घडते. यामागे अनेक शारीरिक व मानसिक कारणे असू शकतात.
सर्वात सामान्य कारण म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे (अॅनिमिया). महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणेनंतर रक्ताची कमतरता निर्माण होते. परिणामी शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि थोडीशी हालचाल केली तरी दम लागतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे थायरॉईडचे त्रास. विशेषतः हायपोथायरॉईडिझममध्ये थकवा, वजन वाढ आणि श्वसनात अडथळा जाणवू शकतो.
कधी कधी ताणतणाव, चिंता किंवा नैराश्य यांसारख्या मानसिक कारणांमुळेही श्वासोच्छवास जलद होतो आणि दम लागल्यासारखे वाटते. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव किंवा बसून राहण्याची सवय यामुळेही शरीराची सहनशक्ती कमी होते. काही वेळा जीवनसत्तव बी१२ किंवा डी ची कमतरता, हार्मोन्सचे असंतुलन किंवा हृदय-फुफ्फुस कार्यातील किरकोळ त्रुटी हेदेखील कारणीभूत ठरु शकतात.
उपाय
रक्त तपासणी करा
हिमोग्लोबिन, थायरॉईड आणि व्हिटॅमिनची चाचणी करुन कारण शोधा. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या.
लोहयुक्त आहार घ्या
पालक, मेथी, खजूर, डाळी, गूळ, विविध धान्ये यांसारखे पदार्थ रोजच्या आगारात ठेवा. आहार फार महत्वाचा असतो.
प्राणायाम व श्वसन व्यायाम
अनुलोम-विलोम, भ्रामरी, खोल श्वास घेण्याचे व्यायाम दररोज १५ मिनिटे करा. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते.
नियमित हालचाल ठेवा
दररोज ३० मिनिटे चालणे, हलका योग किंवा स्ट्रेचिंग केल्याने शरीराची सहनशक्ती वाढते. शरीर कार्यक्षम ठेवणे गरजेचे असते.
ताण कमी करा
ध्यान, शांत संगीत, किंवा आवडत्या छंदात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळते आणि श्वासोच्छवास सुरळीत राहतो.
पुरेशी झोप व पाणी
दररोज ७–८ तास झोप आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी होतो.