Join us

अगदी थोडे काम केले तरी थकवा का येतो? काय कारण असते पाहा , योग्य उपाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 15:56 IST

do you feel tired even after doing a little work? Find out what the reason is and take the right treatment : सारखे अंग दुखते? आळस नाही पाहा काय कारणे असतात.

अनेक महिलांची एकच तक्रार असते. अंग दुखतं, सारखा थकवा जणवतो, थोडेसे काम केले तरी लगेच झोप येते. ही सारी आळशीपणाची लक्षणे आहेत बाकी काही नाही असे टोमणे ऐकावे लागतात. पण नक्की हा फक्त आळसच असतो का? (do you feel tired even after doing a little work? Find out what the reason is and take the right treatment)त्यामागे दुसरे काही कारण असू शकते का ? वयस्कर, वृद्ध महिलांमध्ये वयानुसार थकव्याचे प्रमाण वाढणे अगदी नैसर्गिक आहे. मात्र ही तक्रार तरुण महिलांमध्ये जास्त जाणवते. त्यामागे असणारी कारणे वेळीच जाणून घेतल्यावर त्यावर उपाय करणे सोपे जाते. वेळीच उपाय करायचे. म्हणजे त्रास वाढत नाही. या थकव्यामागे काय कारण असू शकते पाहा. 

१. आहारातील पोषणतत्वांची कमतरता  शरीरात काही गुणधर्मांचा कमतरता असली की थकवा जाणवतो. खास म्हणजे प्रोटीनची गरज असते. त्याची कमतरता अनेकांमध्ये जाणवते. त्याचप्रमाणे लोहाची कमतरता असल्यावरही असा त्रास होतो. जीवनसत्व बी १२ महिलांसाठी फार गरजेचे असते मात्र त्याची कमतरता होणे अगदीच कॉमन अशी समस्या आहे. त्यामुळे वेळीच आहारात बदल करायला हवा. शरीरात पोषकतत्त्वांचा अभाव असल्यास थकवा, स्नायू दुखणे, गुडघे दुखी मांड्या व पाठीचा त्रास जाणवतो.

२. बरेचदा अतिकामामुळे मनावर आणि मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे मग साधी कामे करतानाही थकवा जाणवतो. आठवडाभर भरपूर काम केले की जेव्हा काम कमी असते तेव्हाही मन थकलेले असते. त्यामुळे त्रास होतो. असे सतत झाल्यावर मासिक ताण येतो. त्याची लक्षणे दिसून येत नाहीत त्यामुळे दुर्लक्ष केले जाते. मात्र तसे न करता लक्षणे ओळखायला शिका. 

३. महिलांनी वेळोवेळी ऑल बॉडी टेस्ट करुन घेणे फार गरजेचे आहे. आम्हाला काही होणार नाही काही झालेले नाही मग चाचणी कशाला करायची अशी मानसिकता महिलांची असते. मात्र योग्य कालावधीच्या अंतराने तपासणी करणे गरजेचे असते. त्यामुळे अनेक आजार टाळता येतात. 

मसाज करुन घेणे. मालीश करणे. तेल लावून चोळणे. हे प्रकार करणे अगदी उपयुक्त ठरते. ते करायला हवेच. योग्य झोप घ्यायला हवी. काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र सगळे उपाय केल्यानंतरही त्रास होतच असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

टॅग्स : महिलाआरोग्यहेल्थ टिप्स