एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते. टाचा दुखायला लागतात. जास्त वेळ उभे राहिल्यानेही पायांना सुज येते. (Do You Constantly Have Swollen Hands And Feet? Then Don't Ignore)आजकाल ऑफिसमध्ये एसी असतोच. त्या एसीमध्ये अख्खा दिवस बसल्यामुळेही पायांना सुज येते. खरं तर एसी असला काय, नसला काय नुसतं तासंतास बसल्यानेही पायांना सुज येते. सुजलेल्या हातापायांकडे आपण दुर्लक्ष करतो. कारण ही सर्व साधारण कारणे आपल्याला माहिती असतात. पण जर अशी सुज सारखी येत असेल, तर ते चांगले नाही. कधीतरी अशी सुज येणे साहाजिक आहे. (Do You Constantly Have Swollen Hands And Feet? Then Don't Ignore)पण जर सारखेच असे होत असेल तर, तुम्हाला वैद्य गाठायला हवा. या सुजे मागे काही गंभीर कारणेही लपलेली असतात. या कारणांबद्दल मेडलाइनप्लस, मायोक्लिनिक सारख्या वेबसाईट्सवर पूर्ण माहिती उपलब्ध आहे.
१. जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा बसल्याने शरीरातील द्रव हातापायांच्या बोटांमध्ये उतरते. याला एडेमा असे ही म्हणतात. शरीर स्तब्ध असल्यावर असे घडू शकते. ते द्रव्य तसेच साखळून राहिल्याने सुज येते. ती सुज वेळीच आपोआप गेली नाही, याचा अर्थ काही तरी गडबड आहे.(Do You Constantly Have Swollen Hands And Feet? Then Don't Ignore)
२. अति मीठ खाणार्या लोकांच्या हातापायाला सुज येते. तुम्हाला मीठाचा वापर करणे कमी करायला हवे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न तुमचे शरीर करत आहे असे समजा.
३. लठ्ठपणामुळे अशी सुज शरीराला येते. पायांना आपले वजन सहन होत नाही. हातालाही उठता-बसता आपला भार सहन होत नाही. जर तुमचेही वजन जास्त आहे तर, ते वेळीच कमी करा. टाचाही त्यामुळेच दुखतात.
४. काहीच कारण नसताना जर तुमच्या हाता पायांना सुज येते तर वेळीच रक्तदाब सुरळीत होण्यासाठीचे व्यायाम आणि उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू करा. कारण हातापायाला सुज येणे हा एक संकेत आहे. जो तुम्हाला रक्तदाबाचा त्रास संभवू शकतो असे सुचित करतो. हळूहळू टाचाही असह्य दुखायला लागतात.
५. गरोदर महिलेच्या हातापायाला सुज येणे अगदी साधारण आहे. अचानक वाढणाऱ्या वजनामुळे ती सुज येते. इतरही कारणे असतात. पण एकदा डॉक्टरांशी बोलून घेण्यात काहीच तोटा नाही.