केस चांगले राहण्यासाठी केस विंचरणे फार गरजेचे असते. केस सुंदर आणि मजबूत ठेवण्यासाठी केस दिवसातून दोनदा तरी विंचरायलाच हवे. अनेकांना आंघोळीनंतर लगेच केस विंचरण्याची सवय असते. त्यामुळे केस कमी गुंततात असा अनेकांचा अंदाज असतो. (do you comb wet hair? doing this can cause big harm, see what not to do )मात्र केस ओले असताना ते मऊ आणि लवचिक असतात, म्हणून विंचरणे सोपे वाटले तरी ते केसांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ओले केस फार नाजूक असतात. त्या वेळी केसांची मुळे सैल झालेली असतात आणि केसांवरुन नैसर्गिक तेलाचा थर निघून गेलेला असतो. त्यामुळे अशा अवस्थेत केस विंचरल्यास ते सहज तुटतात किंवा मुळासकट गळतात. त्यामुळे केस विरळ होत जातात आणि हळूहळू केसांचे प्रमाण कमी होते. टक्कलही वाढते. त्यामुळे कधीही ओले केस विंचरु नका.
अनेकजण आंघोळीनंतर पंचा किंवा टॉवेलने केस जोरात झटकतात. ज्यामुळे ते पटकन सुकतील असं वाटतं. पण या सवयीमुळे उलट केसांचे नुकसानच होते. जोरात झटकताना किंवा घासताना केसांमध्ये घर्षण निर्माण होते, त्यामुळे केस गुंततात. फक्त गुंतत नाहीत तर फटका बसल्यामुळे तुटतातही आणि गळतातही. सतत असा ताण दिल्याने केसांची मुळे कमकूवत होतात आणि टाळूवर कोरडेपणा किंवा कोंडा निर्माण होतो. काही वेळा टाळूवर सूक्ष्म जखमा देखील होतात ज्यामुळे केस गळती वाढते.
याऐवजी काही सोप्या आणि योग्य पद्धती वापरल्या, तर केसांचे आरोग्य टिकवता येते. आंघोळीनंतर पंचा किंवा मऊ टॉवेलने केस हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी शोषून घ्या. केस नैसर्गिक हवेत सुकू द्या, ड्रायर वापरताना हलका आणि थंड मोड ठेवा. केस पूर्णपणे कोरडे झाल्यावरच विंचरणे योग्य ठरते. त्यासाठी रुंद दातांचा कंगवा वापरा आणि केसांच्या टोकांपासून वरच्या दिशेने हलक्या हाताने विंचरा.
तसेच आठवड्यातून एक-दोन वेळा हलके तेल चोळल्यास केसांची मुळे मजबूत राहतात आणि गळती कमी होते. आहारात प्रथिने, लोह आणि जीवनसत्व ई असलेले पदार्थ घ्या. या छोट्या सवयींचा अवलंब केल्यास केस मजबूत, चमकदार आणि निरोगी राहतील. ओले केस हाताळताना काळजी घेणे फार महत्वाचे असते.
Web Summary : Avoid rubbing wet hair with a towel and combing it, as it weakens hair roots, causing breakage and hair fall. Gently pat dry with a soft towel and use a wide-toothed comb on dry hair. Oil regularly and maintain a healthy diet for strong, healthy hair.
Web Summary : गीले बालों को तौलिये से रगड़ने और कंघी करने से बचें, क्योंकि इससे बाल कमजोर होते हैं, टूटते हैं और झड़ते हैं। नरम तौलिये से धीरे से सुखाएं और सूखे बालों पर चौड़े दांतों वाली कंघी का इस्तेमाल करें। नियमित रूप से तेल लगाएं और स्वस्थ बालों के लिए स्वस्थ आहार बनाए रखें।