सगळ्यात जास्त कोणाचे चोचले आपण पुरवत असू, तर ते जिभेचेच. पोट नको म्हणाले आणि जीभ हो म्हणत असेल तर आपण खरं पोटाचं ऐकायला हवं, मात्र आपण बरेचदा जिभेचे ऐकतो. अनेक पदार्थ चवीला जेवढे छान असतात, तेवढेच आरोग्यासाठी वाईट असतात. पण दिल है, के मानता नही!! एकवेळ कमी प्रमाणात खातो, पण असे पदार्थ खातो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यावर त्याचा त्रास हा होणारच.(Do you burp after eating, feeling unwell? See the causes of burping and immediate remedies) मग तो पदार्थ पौष्टिक असला तरी. जास्त खाल्ले की अपचन होतो. अपचन ही अगदी कॉमन समस्या आहे. त्यात फार काळजी करण्यासारखे काहीच नाही. मात्र जर सतत अपचन होत असेल तर त्याचे रुपांतर गंभीर त्रासांमध्ये होऊ शकते. शरीर आपल्याला सतत सूचना देत असते, लक्षणे जाणून घेऊन उपाय करता आले पाहिजेत. सततचे अपचन हे पोटात बिघाड असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे सवयी, आहार, दिनचर्या बदलण्याची गरज आहे असे समजून जायचे.
अपचन म्हणजे फक्त उलट्या किंवा सारखे टॉलेटला लागणे, पोट दुखणे एवढेच नाही. (Do you burp after eating, feeling unwell? See the causes of burping and immediate remedies)अगदी साध्या गोष्टीही असतात. ज्या अगदी सामान्य आहेत, मात्र अपचन झाल्याचे लक्षण ठरतात. जसे की सतत ढेकर येणे. जेवणानंतर ढेकर आली म्हणजे पोट समाधानी आहे असे मानले जाते. पण सतत ढेकरा येणे, त्याला वास येणे हे अपचनाचे लक्षण आहे.
पोट फुगणे हे ही अपचनाचे एक लक्षण आहे. छातीत तसेच पोटात सारखे जळजळत असेल तर, ते ही अपचनाचे लक्षण आहे. काही खाल्यावर मळमळणे, कमी खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटणे, पोटात सारखा गोळा येणे ही अपचनाची लक्षणे आहेत. अपचन झाल्यावर सारखे अस्वस्थ वाटत राहते. पोट शांत नसल्याने मन ही विचलित होते. फोटातून विचित्र आवाज येत राहतात. गॅस होतात मात्र पटकन बाहेर पडत नाहीत. साठून राहतात.
अपचनाचे प्रमाण कमी करण्यासाठी काही साधे उपाय करा. जसे की जेवणानंतर ताक प्यायचे. तसेच बडीशेप खायची. फक्त साधी बडीशेप. विड्याचे पान खा. जेवताना दोन घास कमीच जेवा. पोटाचे ऐका. जिभेचे नको. जंक फूड खाणे अगदीच टाळायचे. त्यामुळे अपचनाची समस्या जास्त वाढते. घरी केलेले चांगले अन्नच खायचे. रात्रीच्या वेळी अति जेवायचे नाही. जरा कमीच जेवायचे. जेवण वरवर येईल एवढे खाऊ नका. जास्त उशीरा जेवायचे नाही. वेळा पाळा त्याचा नक्की फायदा होईल. जेवताना घास गिळू नका छान चाऊन खा. घास जर चावला नाही तरीही अपचन होते.