निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या शरीराची नेहमी काळजी घेतो. त्यासाठी संपूर्ण शरीर स्वच्छ असणे देखील महत्त्वाचे असते.(prevent vaginal infection naturally) शरीराच्या बाह्य अंगाची स्वच्छता राखण्यासाठी आपण अनेक विविध उत्पादनांचा वापर करतो. सुगंधित साबण, शाम्पू, फेसवॉश सारख्या वस्तू वापरतो. (how to clean private parts without soap)
त्वचेची स्वच्छता राखणं जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपल्या प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखणं देखील महत्त्वाचे आहे. (natural intimate hygiene tips)आपला प्रायव्हेट पार्ट हा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतो. त्यामुळे त्याची स्वच्छता राखताना अनेकदा महिला साबणाचा वापर करतात.(why not to use soap on vagina or vulva) यामुळे बॅक्टेरिया आणि जंतूंचा धोका कमी होण्याऐवजी तो अधिक प्रमाणात वाढतो.(prevent vaginal infection naturally) जर आपणही योनी मार्गाची स्वच्छता साबणाने करत असू तर वेळीच काळजी घ्यायला हवी. (clean private area without irritation)
ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय, दातांच्या समस्या होतील कमी
बहुतेक महिला आंघोळीसाठी साबण किंवा बॉडी वॉशचा वापर करतात. पण काही महिला प्रायव्हेट पार्ट हा आंघोळीच्या उत्पादनांनी स्वच्छ करतात. परंतु,असे करणे घातक ठरु शकते. मेडिकल न्यूज टुडेनुसार योनी हा एक स्वत:हून स्वच्छ होणारा शरीराचा अवयव आहे. याला कोणत्याही उत्पादनांची आवश्यकता नसते. जास्त साफसफाई किंवा केमिकल्स उत्पादनांनी स्वच्छता केल्यास नकारात्मक परिणाम सहन करावे लागू शकतात.
साबणाने धुतल्याने संसर्ग वाढतो
आपल्या योनीच्या आजूबाजूला चांगले बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतूं असतात जे प्रायव्हेट पार्टला निरोगी ठेवण्यास मदत करतात. अशावेळी आपण साबण किंवा इतर उत्पादनांचा वापर केल्यास योनीची पीएच पातळी असंतुलित होऊ शकते. ज्यामुळे संसर्ग आणि दुर्गंधीचा धोका वाढू शकतो.
PCOS मुळे महिलांना होतात गंभीर आजार, रिसर्चचा धक्कादायक खुलासा-स्वत:ची तब्येत आधी सांभाळा
योनी मार्गाची स्वच्छता कशी कराल?
योनी स्वच्छ करण्यासाठी बाहेरील भाग कोमट पाण्याने धुवा. यासाठी आपण केमिकल फ्री साबणाचा वापर करु शकतो. यानंतर योनी पाण्याने पूर्ण स्वच्छ करा. ती जागा पूर्ण कोरडी असायला हवी. योनीची काळजी व्यवस्थित न घेतल्याने आपल्या इन्फेक्शन होऊ शकते. जर योनी पूर्णपणे कोरडी केली तर खाज सुटण्याची देखील शक्यता अधिक असते.