खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. (avoid 5 foods in fatty liver) लिव्हर किंवा यकृत हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकून देण्याचे काम लिव्हर करते. बदलेली जीवनशैली, जंक फूड आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लिव्हरवर चरबी जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्याच्यावर परिणाम होतो. (Fatty liver disease diet)
फॅटी लिव्हर हा एक गंभीर आजार आहे. जो नॉन- अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणून ओळखला जातो. (fatty liver overweight) लठ्ठपणा आणि मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये याचा सर्वाधिक धोका आपल्याला पाहायला मिळतो. फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे दिसत नाही. त्यामुळे पोटाजवळ चरबी जमा होऊ लागताच, आपल्या जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला आहारातून हे ५ पदार्थ पूर्णपणे काढून टाकायला हवे. यामुळे लिव्हरवर फॅट तयार होते.
1. अल्कोहोल
अल्कोहोल केवळ यकृतासाठी नाही तर संपूर्ण शरीरासाठी हानिकारक आहे. हे अतिप्रमाणात पिऊ नये. जर तुम्हाला यकृताचा कोणताही त्रास असला तरी थोड्या प्रमाणातील अल्कोहोल गंभीर परिणाम देऊ शकतात.
2. रेड मीट
जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट खाल्ल्याने यकृताच्या अवयांमध्ये चरबी साचायला सुरुवात होते. यामध्ये आढळणारे प्रथिने आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यासाठी मर्यादित प्रमाणात खायला हवे.
3. साखर
फॅटी लिव्हरच्या रुग्णांसाठी कँडी, कुकीज, सोडा आणि फळांचे रस यांसारखे साखरयुक्त पदार्था खाणे टाळायला हवे. यात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने यकृतावरील चरबीचे प्रमाण अधिक वाढते.
4. मीठ
जास्त मीठाचे सेवन केल्याने शरीरात NAFLD चा धोका वाढतो. मीठाचे सेवन २३०० मिलीग्रॅमापेक्षा कमी प्रमाणात असायला हवे. जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मीठा़चे सेवन १५०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त नसायला हवे.
5. पांढरे पदार्थ
हल्ली बाजारात मिळणारे पांढरे पदार्थ अनेकांना खावेसे वाटतात. परंतु, यामध्ये सर्वात जास्त प्रक्रिया केली जाते. त्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये फायबर कमी असते. जे खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी पांढरा ब्रेड, भात आणि पास्ता यांसारखे पदार्थ खाऊ नये.