आपल्या दैनंदिन जीवनात झोप अधिक महत्त्वाची आहे. दिवसभराचा ताण, कामाचा थकवा आणि शरीराला आराम मिळण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणं अधिक महत्त्वाचं असतं.(dizziness after waking up) पण अनेकदा असं होत की, झोपेतून उठल्यानंतर शरीर हलकं वाटण्याऐवजी अचानक डोकं गरगरायला लागतं.(morning dizziness causes) पाय जमिनीवर घट्ट टेकत नाहीत. डोळ्यांसमोर अंधार दाटल्यासारखा वाटू लागतो. हे जरी क्षणिक असलं तर आपल्याला अस्वस्थ करुन जाते. (why do I feel dizzy after waking up)
अनेकांना ही चक्कर वाटते किंवा रात्रीचा थकवा, झोप नीट न झाल्यामुळे अशी समस्या निर्माण झाली असं वाटू लागतं. पण हा त्रास वारंवार होत असेल तर समस्या गंभीर असू शकते.(dizziness in the morning reasons) हा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. झोपेतून उठल्यानंतर येणाऱ्या या चक्करच्या समस्यांकडे आपण नेहेमीच दुर्लक्ष करतो. पण असं का होतं जाणून घेऊया.
रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी
मेयोक्लिनीकच्या मते, बसून किंवा झोपून अचानक उभे राहिल्यावर चक्कर येते आणि डोळ्यांपुढे अंधारी दाटू लागते. या स्थितीला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असं म्हणतात. यात दृष्टी अंधुक होणं, अशक्तपणा, बेशुद्ध होण्याची स्थिती येते. यामागची नेमकी कारणं काय पाहूया.
1. अचानक उभं राहिल्यावर चक्कर किंवा डोळ्यांवर अंधारी येत असेल तर ही डिहायड्रेशनची समस्या असू शकते. यास्थितीत रक्तदाब झपाट्याने कमी होतो. यामागे अनेक कारणं असली तरी सगळ्यात सामान्य म्हणजे डिहायड्ररेशन. यात शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास अचानक रक्तदाब कमी होतो.
2. जर आपण नियमितपणे काही औषधे खात असू तर त्या औषधांचा हा दुष्परिणाम असू शकतो. ज्यामध्ये रक्तदाह किंवा हृदयरोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश असतो. यामुळे रक्तदाब अनियंत्रित होतो. ज्यामुळे चक्कर येते.
3. अशक्तपणा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि चक्कर येऊ लागते.
4. जर आपण खूप प्रमाणात अल्कोहोल आणि स्मोकिंग करत असू तर यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते किंवा डोळ्यांसमोर अंधार येण्याचे कारण असू शकते. अल्कोहोल पिण्यामुळे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनचा धोका वाढू शकतो.
5. आपण शरीराच्या गरजेनुसार पुरेसे पाणी प्यायला हवं. झोपेतून उठल्यानंतर हळूहळू उभे राहायला हवे. नियमित व्यायाम करा आणि निरोगी आहार घ्या.