Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रात्री झोपण्याआधी गारेगार आइस्क्रीन खाणं पडू शकतं महागात, पाहा कोणत्या आजारांचा वाढतो धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:03 IST

Health Tips : झोपण्यापूर्वी आइस्क्रीम खाणं योग्य आहे का? की ही सवय हळूहळू आरोग्यावर परिणाम करू शकते? असा प्रश्नही अनेकांना पडतो. चला पाहूयात या प्रश्नांची उत्तरं...

Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. खासकरून उन्हाळा सुरू झाल्यावर तर जास्तीत जास्त लोक रात्री जेवणानंतर गारेगार आइस्क्रीमचा आनंद घेतात. लहानांसोबतच मोठेही भरभरून आइस्क्रीम खातात. आइस्क्रीमचा थंड आणि गोड स्वाद अनेकांना आवडतो. पण झोपण्यापूर्वी आइस्क्रीम खाणं योग्य आहे का? की ही सवय हळूहळू आरोग्यावर परिणाम करू शकते? असा प्रश्नही अनेकांना पडतो. चला पाहूयात या प्रश्नांची उत्तरं...

वजन वाढू शकतं

आइस्क्रीममध्ये साखर आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं. रात्री ते खाल्ल्यास शरीराला ते पचवण्यासाठी अधिक वेळ लागतो. झोपताना आपला मेटाबॉलिझम मंदावतो, त्यामुळे जास्त कॅलरी असलेले पदार्थ वजन वाढवू शकतात. ही सवय रोजची झाली तर पोटाची चरबी आणि एकूण वजन वाढण्याची शक्यता असते.

ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते

आइस्क्रीममधील जास्त साखर अचानक रक्तातील साखरेची लेव्हल वाढवते आणि काही वेळाने ती झपाट्याने कमी होते. या चढ-उतारामुळे झोपेची क्वालिटी बिघडू शकते. काही लोकांना अस्वस्थता, घाम येणे किंवा रात्री वारंवार जाग येण्याची समस्या जाणवू शकते.

सर्दी-खोकल्याचा त्रास

रात्री थंड पदार्थ खाल्ल्यामुळे घसा बसणे, खोकला किंवा सर्दी होण्याची शक्यता असते, खासकरून ज्यांना सायनस किंवा अ‍ॅलर्जीचा त्रास आहे. अशा लोकांनी रात्री आइस्क्रीम टाळणे चांगले.

मग आइस्क्रीम पूर्णपणे बंद करावे का?

तसे नाही. कधीकधी आणि मर्यादित प्रमाणात आइस्क्रीम खाल्ले तर फार काळजीची गरज नाही. मात्र ते जेवणानंतर लगेच खाऊ नये आणि जास्त प्रमाणात घेऊ नये. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, मधुमेह, पचनासंबंधी समस्या किंवा थायरॉईडचा त्रास असेल, तर रात्री आइस्क्रीम टाळणे अधिक योग्य ठरेल. त्याऐवजी दही, ताजे फळ किंवा थोडी डार्क चॉकलेट असा हलका पर्याय निवडू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्ससमर स्पेशल