Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नखांत अडकलेली माती-घाण निघतच नाही? सोपे घरगुती उपाय-नखे राहतात स्वच्छ आणि आजारपण लांब

नखांत अडकलेली माती-घाण निघतच नाही? सोपे घरगुती उपाय-नखे राहतात स्वच्छ आणि आजारपण लांब

Dirt stuck in your nails won't come off? Simple home remedies : नखात अडकलेली घाण काढण्यासाठी सोपा उपाय. पाहा काय कराल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 10:07 IST2025-06-10T10:06:46+5:302025-06-10T10:07:33+5:30

Dirt stuck in your nails won't come off? Simple home remedies : नखात अडकलेली घाण काढण्यासाठी सोपा उपाय. पाहा काय कराल.

Dirt stuck in your nails won't come off? Simple home remedies | नखांत अडकलेली माती-घाण निघतच नाही? सोपे घरगुती उपाय-नखे राहतात स्वच्छ आणि आजारपण लांब

नखांत अडकलेली माती-घाण निघतच नाही? सोपे घरगुती उपाय-नखे राहतात स्वच्छ आणि आजारपण लांब

शरीराचा प्रत्येक अवयव साफ करणे फार गरजेचे असते. फक्त अंघोळ केली म्हणजे स्वच्छता झाली असे होत नाही.(Dirt stuck in your nails won't come off? Simple home remedies ) टापटीप राहणे तसेच नीट नेटके राहणे फक्त दिसायला चांगले असते म्हणून करायचे नाही. तर व्यवस्थित राहणे आरोग्यासाठीही गरजेचे असते. वेळच्यावेळी चेहरा धुवायचा. केस कापायचे. व्यक्तिमत्व चांगले दिसण्यासाठीही विविध गोष्टी करणे गरजेचे असते.  बरेचदा आपण हे विसरुन जातो की आपल्याला सगळ्या अवयवांची काळजी घ्यायला हवी. अनेकांना नखे खायची सवय असते. मात्र ती सवय नक्कीच चांगली नाही. 

हाताची नखे वेळेवर कापली जातात. मात्र पायाच्या नखांकडे बरेचदा दुर्लक्ष होते. तसे करुन चालणार नाही. वेळोवेळी नखे स्वच्छ करायलाच हवीत. नखांमध्ये काळी माती अडकलेली असते. नखांमध्ये अडकलेली ही माती फक्त धूळ आणि घाण नसते तर त्यात जंत असतात. विषाणू असतात. नखे चावताना ते तोंडात जातात. पोटात जातात त्यामुळे आजारपण येते. नखे खात नसलात तरी ती स्वच्छ तर ठेवायलाच हवीत. नखांमधील माती नेलकटरने चांगली साफ होत नाही. कितीही साफ केले तर पुन्हा माती साठते. यासाठी काय कराल ते जाणून घ्या. 

हाताची बोटे आणि पायाची बोटे कोमट पाण्यात बुडवायची. पाण्यात थोडा बेकिंग सोडा घालायचा आणि मीठही घालायचे. पाणी पूर्ण थंड होईपर्यंत पाण्यात बोटे बुडवायची. नखांजवळचा भाग मऊ होतो. त्यातील थोडी माती निघते आणि नंतर उरलेली माती नेलकटरच्या मदतीने काढायची.  हा उपाय नक्की उपयुक्त ठरेल.

मऊ ब्रशचा वापर करुन माती काढता येते.  ब्रशला साबण लावाचा. बोटे पाण्यात थोडावेळ भिजत ठेवायची. मग ब्रशने अलगद घासायची. असे केल्याने बोटांमध्ये अ़डकलेली घाण निघते. मात्र जास्त जोरात घासायचे नाही. नखांमधील त्वचेला त्रास होऊ शकतो. अगदी हळू व सौम्यपणे ब्रश फिरवायचा. 

नखे जास्त वाढू देऊ नका. नखे वेळीच कापायची. म्हणजे जास्त माती अडकत नाही. नख मोठे असल्यावर माती आत रुतते. तसे होऊ नये म्हणून नखे वेळोवेळी कापायची.   

Web Title: Dirt stuck in your nails won't come off? Simple home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.