Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सणावाराला भरपूर खाणं होत ? ओव्हरइटिंगचा त्रास, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ टिप्स - 'अशी' घ्या तब्येतीची काळजी...

सणावाराला भरपूर खाणं होत ? ओव्हरइटिंगचा त्रास, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ टिप्स - 'अशी' घ्या तब्येतीची काळजी...

Diet Hacks to Prevent Overeating During Festive Season : diet hacks for festive season : how to avoid overeating during festivals : festive eating healthy tips : सणावाराचा आनंद घेताना आरोग्य कसे जपावे यासाठी काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2025 15:36 IST2025-08-27T15:31:50+5:302025-08-27T15:36:22+5:30

Diet Hacks to Prevent Overeating During Festive Season : diet hacks for festive season : how to avoid overeating during festivals : festive eating healthy tips : सणावाराचा आनंद घेताना आरोग्य कसे जपावे यासाठी काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स...

Diet Hacks to Prevent Overeating During Festive Season diet hacks for festive season how to avoid overeating during festivals festive eating healthy tips | सणावाराला भरपूर खाणं होत ? ओव्हरइटिंगचा त्रास, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ टिप्स - 'अशी' घ्या तब्येतीची काळजी...

सणावाराला भरपूर खाणं होत ? ओव्हरइटिंगचा त्रास, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ टिप्स - 'अशी' घ्या तब्येतीची काळजी...

गौरी - गणपतीचा उत्सव म्हणजे आनंद, उत्साह, जल्लोष आणि पोटभर गोडाधोडाचे पदार्थ खाण्याचा खास सण! घरात बाप्पांचे आगमन झाले की मग पुढील दहा दिवस घरात वेगवेगळ्या पदार्थांची जणू मेजवानीच असते. बाप्पाला दररोज नैवेद्य दाखवायचा आणि बाप्पांचा प्रसाद म्हणून घरात अनेक प्रकारची पंचपक्वान्न तयार (Diet Hacks to Prevent Overeating During Festive Season) केली जातात. सणावाराला केल्या जाणाऱ्या या खास पदार्थांमध्ये गोडापासून तिखटापर्यंत अनेक पदार्थ असतातच. आपण घरात केल्या जाणाऱ्या पदार्थांवर तर ताव मारतोच सोबतच, मित्र-मैत्रिणी ( diet hacks for festive season) आणि नातेवाईकांकडे जाऊन देखील आपण अनेक पदार्थांचा आस्वाद घेतोच. पण, अनेकदा या आनंदात आपण प्रमाणापेक्षा जास्त खातो, ज्यामुळे पोटदुखी, अपचन आणि पित्तसारख्या समस्या उद्भवतात(how to avoid overeating during festivals).

सणासुदीचा हा काळ आरोग्याच्या दृष्टीनेही तितकाच  महत्त्वाचा असतो. सणाचा आनंद साजरा करताना आपल्या आरोग्यासोबतच खाण्यापिण्याची देखील तितकीच काळजी घेणे गरजेचे असते. गणेशोत्सवाचा (festive eating healthy tips) पूर्ण आनंद घेतानाच आरोग्य कसे जपावे यासाठी काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स पाहूयात. न्यूट्रिवाइज क्लिनिकच्या न्यूट्रिशनिस्ट नेहा सिन्हा यांनी सणावारा दरम्यान ओव्हरइटिंग होऊ नये यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत त्या पाहूयात... 

सणावारा दरम्यान ओव्हरइटिंग होऊ नये यासाठी खास टिप्स... 

१. सणवारा दरम्यान केले जाणारे खास पारंपरिक व गोडाधोडाचे पदार्थ कधी खावेत ? 

न्यूट्रिशनिस्ट नेहा सिन्हा यांच्या मते, जर तुम्हाला सणवारा दरम्यान ओव्हर इटिंग टाळायचे असेल, तर सणासुदीच्या पारंपरिक व गोडाधोडाच्या पदार्थांच्या खाण्याच्या वेळा आणि क्रम बदलणे गरजेचे असते. कोणताही पदार्थ खायचा असेल तर तो कमी प्रमाणातच खा, फक्त ते पदार्थ योग्य वेळी खाणे आवश्यक आहे. सकाळी उठल्याबरोबर किंवा रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाणे टाळा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. पदार्थ किंवा मिठाई एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी त्याचे छोटे-छोटे भाग करा आणि दिवसभरात वेगवेगळ्या वेळी खा. गोड किंवा इतर कोणताही पदार्थ खाण्याआधी भरपूर सॅलड खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे पोट भरलेले राहील आणि तुम्ही कमी खाऊ शकाल.

मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी अजिबात करु नका ‘ही’ ५ कामं, त्यांचा जातो मूड-अभ्यासात लागत नाही लक्ष...

२. मिठाई खाताना 'पोर्शन कंट्रोल' कसे कराल ?

अनेकदा आपण समोर ठेवलेली मिठाई संपूर्ण एकाच वेळी एकदम खातो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. हे टाळण्यासाठी 'पोर्शन कंट्रोल' करणे खूप महत्त्वाचे आहे. पूर्ण मिठाई खाण्याऐवजी तिचा एक छोटा तुकडा खा. बाजारातील मिठाई खाण्याऐवजी, घरी बनवलेली कमी साखरेची आणि ताजी मिठाई खा. यामुळे आरोग्याची काळजी घेतली जाईल. हे छोटेसे बदल तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

गरोदरपणानंतर पोटावर-दंडावर मोठ्ठे स्ट्रेच मार्क आले? ‘हे’ पारंपरिक तेल लावा-स्ट्रेच मार्क होतील कमी...

३. फायबर आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या :- न्यूट्रिशनिस्ट नेहा सिन्हा यांच्या मते, सणासुदीच्या काळात अति खाणे टाळण्यासाठी तुमच्या आहारात फायबरयुक्त फळे आणि सुकामेवा यांचा समावेश करणे आवश्यक आहे. फायबरमुळे पचन चांगले होते आणि पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही कमी खाता आणि 'ओवरइटिंग'ची समस्या टाळता येते. याव्यतिरिक्त, सणांदरम्यान ताजी फळे खाण्यावर भर द्या. हे छोटे बदल तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास नक्कीच मदत करतील.


 
 ४. हलकी ॲक्टिव्हिटी करायला विसरू नका :- सणासुदीच्या काळात ओव्हर इटिंग टाळायचे असेल तर हलकी ॲक्टिव्हिटी करणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज किमान ३० मिनिटे चाला. यामुळे रक्तातील साखरेची वाढलेली पातळी आणि पचनाच्या समस्या टाळता येतात. अनुलोम-विलोम प्राणायाम किंवा हलकी स्ट्रेचिंग करून तुम्ही स्वतःला आराम देऊ शकता. यामुळे मन शांत होते आणि अति खाण्याची इच्छा कमी होते. सणांच्या दिवसांत तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोज थोडा वेळ एक्सरसाइजसाठी नक्कीच काढा.

५. हायड्रेटेड रहा आणि गोड पेये टाळा :- सणासुदीच्या दिवसांत निरोगी राहण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे शरीर पुरेसे हायड्रेटेड ठेवणे. डिहायड्रेशन, थकवा आणि अति खाणे टाळण्यासाठी वेळोवेळी पाणी पीत राहा. गोड सरबत किंवा कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी लिंबू पाणी किंवा नारळ पाणी यांसारख्या आरोग्यदायी पेयांचा समावेश करा. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरात ऊर्जा येईल आणि अपचनासारख्या समस्या दूर राहतील.

Web Title: Diet Hacks to Prevent Overeating During Festive Season diet hacks for festive season how to avoid overeating during festivals festive eating healthy tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.