सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे काही खाण्याची इच्छा आपोआपच कमी होते. काहीतरी खाण्यापेक्षा थंडगार असं काहीतरी प्यावं वाटतं. त्यामुळे मग लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हं, नारळपाणी अशी पारंपरिक पेय पिण्याकडे आपला कल थोडा जास्त असतो. अशी पेयं प्यायल्याने उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. सर्वसामान्य लोकांसाठी हे सगळं ठिक आहे. पण ज्यांना डायबिटीस किंवा मधुमेह असतो त्या लोकांना मात्र हे सगळे पेय घेताना निश्चितच विचार करावा लागतो. कारण हे सगळे पेय गोड असतात. आता त्यातल्या त्यात नारळपाणी हे एक नॅचरल पेय आहे. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्ती ते जास्त प्रमाणात पितात (Does Coconut Water Causes Sugar Spike In Diabetic Patients?). पण खरंच नारळपाणी पिणं मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य असतं का? त्यामुळे त्यांची शुगर वाढू शकते का? याविषयी तज्ज्ञ काय सांगतात ते एकदा पाहायलाच हवं..(is it good for diabetic patient to have coconut water?)
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी नारळपाणी प्यायलं तर चालतं का?
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी नारळपाणी प्यायलं तर ते त्यांच्यासाठी कितपत योग्य ठरू शकतं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
यामध्ये त्यांनी २ महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे ज्याप्रमाणे प्रत्येक फळामध्ये नैसर्गिकपणे साखरेचे प्रमाण असते, तसेच ते नारळपाण्यामध्येही असते. त्यामुळे जर तुम्ही १०० ते १५० मिली एवढं नारळपाणी पित असाल तर ते योग्य आहे. त्यामुळे रक्तातील साखर वाढणार नाही. पण त्यापेक्षा जास्त प्रमाणात किंवा एक अख्खं नारळपाणी तुम्ही एकाचवेळी घेत असाल तर त्यामुळे मात्र रक्तातील साखर वाढू शकते.
जर तुम्हाला १०० किंवा १५० मिलीपेक्षा जास्त नारळ पाणी प्यायचंच असेल तर त्यामुळे मात्र एकदम शुगर स्पाईक होऊ शकते. म्हणजेच रक्तातील साखर एकदम वाढू शकते.
वय वाढलं तरी त्वचा सुरकुतणार नाही! ५ पदार्थ रोज खा- म्हातारपणीही त्वचा राहील तरुण
त्यामुळे नारळपाण्यात एक चमचा भिजवलेला सब्जा किंवा चिया सीड्स किंवा जवस टाकून घ्यावे. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण एकदम वाढणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे.