Lemon Water In Diabetes: मधुमेह म्हणजेच डायबिटीस एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. एकदा का आजार झाला तर आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. कारण यावर कोणताही ठोस उपाय नाही. डायबिटीस तुम्ही पूर्णपणे बरा करू शकत नाही. फक्त कंट्रोल करू शकता. या आजाराचे दोन प्रकार असतात एक म्हणजे टाइप 1 डायबिटीस आणि टाइप 2 डायबिटीस. हे दोन्ही डायबिटीस शरीराचं गंभीर नुकसान करतात. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांना साखर किंवा गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या आहाराची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. थोडंही दुर्लक्ष महागात पडू शकतं.
जास्तीत जास्त लोक आपल्या दिवसाची सुरूवात लिंबू पाणी पिऊन करतात. लिंबू पाण्यानं शरीर दिवसभर हायड्रेट राहतं. सोबतच शरीराला याचे अनेक फायदेही मिळतात. पण डायबिटीसच्या रूग्णांनी लिंबू पाणी प्यावं की नाही? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. लिंबू पाण्याचा ब्लड शुगर लेव्हलवर काय प्रभाव पडतो हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं.
डायबिटीस असल्यावर लिंबू पाणी प्यावं की नाही?
अमेरिकन डायबिटीस असोसिएशनच्या एका रिपोर्टनुसार, सामान्य लोकांसोबतच डायबिटीसच्या रूग्णांसाठी देखील लिंबू पाणी सुपरफूड ठरू शकतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं. जे डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतं.
याउलट हेल्थ लाईनचा एक रिपोर्ट सांगतो की, लिंबू पाण्याचा डायबिटीसच्या रूग्णांवर काय प्रभाव पडतो याबाबत 2007 मध्ये एक रिसर्च करण्यात आला. हा रिसर्च सहा आठवडे करण्यात आला. त्यानंतर असं आढळून आलं की, रोज 1 हजार मिली ग्रॅम व्हिटॅमिन सी शरीरात गेल्यानं ब्लड शुगर आणि लिपिडचं प्रमाण कमी होत असल्यानं टाइप 2 डायबिटीसमध्ये होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात.