Join us

चालताना 'ही' ४ लक्षणे दिसताच व्हा सावध! असू शकते डायबिटीसची सुरुवात, पाहा तुम्हाला असा त्रास होतोय का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 12:32 IST

Signs of diabetes to watch for: Early symptoms of diabetes: Diabetes symptoms walking can help: Is walking good for diabetes management: How to recognize diabetes symptoms: What are the signs of high blood sugar: 4 key symptoms of diabetes: Walking and diabetes control: चालताना किंवा उठता-बसता आपल्यालाही हा त्रास जाणवला तर वेळीच रक्ताची तपासणी करा.

वजन कमी करण्यासाठी किंवा शरीर अधिक काळ सक्रिय ठेवण्यासाठी आपण नियमितपणे चालतो किंवा धावतो.(Signs of diabetes to watch for) परंतु, वाढत्या वयानुसार शरीर जास्त सक्रिय असले की हात-पाय दुखणे किंवा थकवा येण्याच्या समस्या वाढतात. (Early symptoms of diabetes)हल्ली मधुमेहाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये तरुणांचा देखील समावेश आहे. 

मधुमेह ही शरीरातील इन्सुलिन संप्रेरकाच्या असंतुलनामुळे होणारी गंभीर समस्या आहे. यावर सध्यातरी कोणताही इलाज नाही. (What are the signs of high blood sugar) मधुमेह हा आपल्या शरीरावर हळूहळू परिणाम करतो. सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे सौम्य दिसतात.(4 key symptoms of diabetes) जी शारीरिक हालचाली दरम्यान स्पष्टपणे दिसून येतात. जर चालताना किंवा उठता-बसता आपल्यालाही हा त्रास जाणवला तर वेळीच रक्ताची तपासणी करा. 

मुलांच्या मेंदूवर कायमचा परिणाम करणाऱ्या ४ सवयी, मुलांना वेड लागण्यापूर्वी सावध व्हा!

1. थकवा आणि अशक्तपणा

मधुमेही रुग्णांमध्ये थकवा आणि अशक्तपणा ही सामान्य लक्षणे आहेत. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त असते तेव्हा शरीराच्या पेशी ऊर्जेसाठी जास्त ग्लुकोजचा वापर करु शकत नाही. यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. व्यक्तीला थकवा जाणवतो. चालताना हा थकवा आणखी वाढतो, कारण शारीरिक हालचाली करताना जास्त ऊर्जा लागते. थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. 

2. पाय दुखणे किंवा सुन्न होणे 

मधुमेहामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते, ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. यामध्ये पायांमध्ये वेदना, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवू शकतो. चालताना पायांवर दबाव असल्याने ही समस्या अधिक तीव्र होते. चालताना जर आपल्या पायांमध्ये असामान्य वेदना किंवा अस्वस्थता जाणवत असेल. मधुमेहाचे लक्षण असू शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

3. श्वास लागणे 

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या अनेकदा दिसून येते. जेव्हा एखादी व्यक्ती चालते किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करते तेव्हा ही समस्या आणखी वाढते. मधुमेहामुळे हृदय आणि फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव येतो. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

4. पायांना सूज येणे 

मधुमेहामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे पायांना सूज येते. चालताना ही सूज अधिक लक्षात येऊ शकते. पायांवर दबाव असतो. मधुमेहामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो.ज्यामुळे शरीरात द्रव जमा होऊ लागतो. सूज येण्याची समस्या वाढते. पाय कोणत्याही दुखापतीशिवाय सुजत असतील तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह