Join us

पाऊस पडताच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ! डेंग्यूपासून संरक्षण करण्यासाठी ५ टिप्स, लहान मुलांची घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2025 20:04 IST

Preventive Tips For Dengue: डेंग्यू होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? डेंग्यूची लक्षणं नेमकी कशी ओळखायची?(how to protect your self and your family from dengue?)

ठळक मुद्दे डेंग्यूपासून स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर सगळ्यात आधी आपल्याला डास चावू नये याचीच काळजी घ्यायला हवी..

पावसाळा सुरू झाला की डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. सध्या आधीच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याने जनसामान्यांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात आता वेळेआधीच पावसाळा सुरू झाल्याने इतरही अनेक आजारांचा धोका वाढला आहे. पाऊस पडायला सुरुवात झाली की पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून राहाते. त्यामुळे मग त्या पाण्यात डास होतात. डासांमुळे मग मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार वाढायला लागतात. हल्ली डेंग्यूचे बरेच रुग्ण दिसत आहेत. अभिनेता इमरान हाश्मी यालाही डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त आहे (Preventive Tips For Dengue). त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांना डेंग्यूपासून सुरक्षित ठेवायचे असेल तर त्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते पाहूया..(how to protect your self and your family from dengue?)

 

डेंग्यू होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

१. आपल्याला माहितीच आहे की एडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे डेंग्यू होतो. त्यामुळे जर डेंग्यूपासून स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर सगळ्यात आधी आपल्याला डास चावू नये याचीच काळजी घ्यायला हवी. साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होते. त्यामुळे पावसाचे पाणी आपल्या अंगणात, बाल्कनीत, टेरेसमध्ये जिथे कुठे साचत असेल तिथे ते साचून राहणार नाही याची काळजी घ्या.

राेपांची पानं पिवळी पडून सुकायला लागली? १ सोपा उपाय- राेपं होतील हिरवीगार, टवटवीत 

२. मुलांना नेहमी अंगभर कपडे घालून ठेवा. यामुळे डास चावण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

३. तुमच्याकडे जी काही रोपे असतील त्या रोपांच्या कुंडीखाली ठेवलेल्या प्लेट्समध्ये राेज पाणी जमा होऊन त्यात डास तर होणार नाहीत ना, हे एकदा तपासून पाहा.

 

४. घरात जर तुम्ही पाणी भरून ठेवत असाल तर ते पाण्याचे भांडे दर दोन ते तीन दिवसांतून एकदा रिकामे करून स्वच्छ घासून घ्या. यामुळे त्या पाण्यात डास होण्याची शक्यता खूप कमी होते.

वटपौर्णिमेच्या पारंपरिक लूकसाठी बुगडी घ्यायची म्हणता? पाहा १ ग्रॅममध्ये येणाऱ्या बुगड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स..

५. घर नेहमी स्वच्छ ठेवा. घरात कुठेही अडगळीचे सामान ठेवू नका. अडगळीच्या वस्तू आजुबाजुला असल्यावर तिथे डासांचे प्रमाणही वाढायला लागते.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडेंग्यूमोसमी पाऊसपाऊस