Join us

कबुतरांच्या विष्ठेमुळे होतात 'हे' गंभीर आजार, पुण्य कमवण्यासाठी दाणे टाकणे महागात, वाढते शारीरिक पीडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:35 IST

जेव्हा खाणं सहजपणे मिळू लागतं तेव्हा कबूतरांची संख्या अधिक वाढते. अर्बन इकोलॉजिस्ट यांना 'उडणारे उंदीर' म्हणतात.

कबुतरांना दाणे टाकणं हे अनेकांचं आवडीचं काम असतं. त्यांना वाटतं असतं की, मुक्या जीवांना आपण अन्न देतो. हे एक पुण्य आहे. शहरांमध्ये तर बरेच लोक खिशातील पैसे खर्च करून कबुतरांना दाणे टाकतात. पण असं करणं किंवा त्यांच्या जवळ जाणं किती घातक ठरू शकतं हे अनेकांना माहीत नसतं. ते आज आपणं पाहणार आहोत.

मुंबईतील डॉ. दीपेश जी अग्रवाल यांनी कबुतरांना दाणे टाकणं किती घातक असतं याबाबत NBT ला माहिती दिली आहे. यामुळे आरोग्यासंबंधी काय काय समस्या होऊ शकतात हेही सांगितलं आहे, जेणेकरून लोकांनी ही गोष्ट टाळावी. डॉक्टर दीपेश सांगतात की, मुंबईसारख्या शहरामध्ये कबुतरांना खाऊ घालणारे झोन किंवा कबुतरखाने कॉमन झाले आहेत. बरेच लोक इथे जाऊन कबुतरांना दाणे टाकतात. 

डॉ. अग्रवाल सांगतात की, जेव्हा खाणं सहजपणे मिळू लागतं तेव्हा कबूतरांची संख्या अधिक वाढते. अर्बन इकोलॉजिस्ट यांना 'उडणारे उंदीर' म्हणतात. कारण उंदरांप्रमाणे अधिक प्रजनन, आजार पसरवण्याची क्षमता आणि सार्वजनिक ठिकाणं डॅमेज करणं हे त्यांचं काम असतं.

कबूतरांच्या विष्ठेमुळे होणारे आजार

कबुतरांच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यानं वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. घराच्या बाल्कनीत अनेकदा त्यांनी घाण करून ठेवलेली असते. यात यूरिक अ‍ॅसिड आणि अमोनियाचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे घातक बॅक्टेरिया आणि फंगस वाढतात.

हिस्टोप्लास्मोसिस - कबुतरांची वाळलेली विष्ठा जर श्वासाद्वारे शरीरात गेली तर फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं.

क्रिप्टोकॉकोसिस - हे एक फंगल इन्फेक्शन आहे. जे फुप्फुसं आणि मेंदुला प्रभावित करू शकतं.

हायपरसेंसिटिविटी न्यूमोनायटिस-  पंख आणि विष्ठेचे कण श्वासाद्वारे शरीरात गेले तर एक अ‍ॅलर्जिक लंग डिजीज होऊ शकतो. जास्त काळ याच्या संपर्कात राहिल्यानं फुप्फुसं नेहमीसाठी डॅमेज होऊ शकतात.

शहरांमधील हॉस्पिटल्समध्ये जुना खोकला, श्वासाची समस्या आणि फुप्फुसांमध्ये सूज जसे की, रेस्पिरेटरी समस्या वाढतात. ही लक्षणं अनेकदा जास्त वेळ कबुतरांच्या संपर्कात राहिल्यामुळे दिसतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य