आपल्यापैकी अनेकांची सकाळ गरमागरम चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय सुरूच होत नाही. अनेकांना तर कॉफी, चहा इतका कडक आणि गरम लागतो की तो पेल्यातून ओठांना लागेपर्यंत त्यातून वाफा निघत असाव्या अशी इच्छा असते. इतकंच नाही तर, वाफाळते सूप, गरम भात किंवा ताजं गरम अन्न लगेच खाण्याची सवयही अनेकांना असते. मात्र अतिशय गरम अन्न किंवा पेय वारंवार खाल्ल्याने त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, हे अनेकांना माहित नसते(dangers of drinking very hot beverages).
तज्ज्ञांच्या मते, खूप गरम पदार्थ थेट घशातून पोटात गेल्यास अन्ननलिकेच्या आतील भागाला इजा होऊ शकते आणि दीर्घकाळात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे चहा किंवा अन्न किती गरम असावे, ते कसे आणि कधी खावे याबाबत योग्य माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिगरम अन्नपदार्थ खाण्याचे धोके आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल अधिक माहिती पाहूयात... न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी इंस्टाग्राम (nutritionist warns about hot tea drinking habit) पोस्टच्या माध्यमातून चहा पिण्याशी संबंधित याच चुकीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे, जी अनेक लोक नकळतपणे वारंवार करतात.
फार गरम किंवा वाफाळते अन्नपदार्थ किंवा चहा व कॉफी प्यायल्याने काय होते ?
न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन म्हणतात की, चहा आणि कॉफी तर आपण सगळेच अगदी दररोज पितोच. परंतु चहा किंवा कॉफीमुळे नाही , तर त्याच्या गरम तापमानामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात, इतकच नाही तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका देखील वाढू शकतो.
जर तुम्हाला खूप जास्त गरम चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल, तर खरी समस्या त्याच्या गरम तापमानामुळेच होते, जे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढवू शकतात. याचप्रमाणे, जर तुम्ही खूप जास्त गरम दलिया किंवा सूप पीत असाल, किंवा खूप जास्त गरम अन्न खात असाल, तरीही कॅन्सरचा धोका संभवतो.
तूप खाणं सोडलंय? लठ्ठ असाल तरीही रोज खा 'इतके' चमचे तूप; हृदयविकाराचा धोका टळून होईल वेटलॉसही...
डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ सुपरफूड्स...
गरम अन्नपदार्थ आणि कॅन्सर यांचा नेमका काय संबंध ?
लीमा महाजन यांच्या मते, धोका चहा किंवा कॉफीमध्ये नसून त्याच्या 'तापमाना'मध्ये (Temperature) आहे. जर तुम्हाला अतिशय गरम चहा, कॉफी, सूप किंवा अगदी गरम अन्नपदार्थ खाण्याची सवय असेल, तर ही सवय कॅन्सरचा धोका वाढवू शकते. जेव्हा आपण खूप जास्त गरम अन्नपदार्थ खातो तेव्हा ते आपल्या अन्ननलिकेला इजा पोहोचवतात. अति उष्णतेमुळे 'इसोफेगस स्क्वॅमस सेल कार्सिनोमा' होण्याचा धोका वाढतो. हा कर्करोगाचा असा प्रकार आहे जो अन्ननलिकेच्या वरच्या थरातील पेशींमध्ये विकसित होतो.
एका संशोधनानुसार, जर तुम्ही ६५ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाचे पेय किंवा अन्नपदार्थ वारंवार खातपित असाल, तर हा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. 'इंटरनॅशनल एजन्सी फॉर कॅन्सर रिसर्च' या रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, गरम अन्नपदार्थ, वाफाळता चहा किंवा कॉफी प्यायल्यास जरी आज कॅन्सर झाला नाही, तरी ही सवय न बदलल्यास भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते.
न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन सांगतात की, चहा - कॉफी पिण्याची सवय कॅन्सरचे कारण होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही न घाबरता योग्य प्रमाणात चहा - कॉफी पिऊ शकता, परंतु फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणतेही पेय खूप जास्त गरम असताना पिऊ नका. हलके गरम किंवा कोमट पिणे सुरक्षित असते, पण ते 'खूप जास्त गरम' नसावे.
Web Summary : Consuming very hot food and drinks can damage the esophagus, potentially increasing cancer risk. Nutritionists advise letting food cool slightly before consumption to avoid harm.
Web Summary : बहुत गरम भोजन और पेय पदार्थों का सेवन अन्नप्रणाली को नुकसान पहुंचा सकता है, जिससे कैंसर का खतरा बढ़ सकता है। पोषण विशेषज्ञ भोजन को थोड़ा ठंडा करने की सलाह देते हैं।