Join us
Daily Top 2 Weekly Top 5

'बॉर्डर २' फेम दिलजीत दोसांझ सांगतो, पारंपरिक पंजाबी 'विंटर सिक्रेट'! सर्दी-खोकला बरा करणारा भन्नाट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2026 12:40 IST

Daljit Dosanjh winter care home remedy : Daljit Dosanjh cold and cough remedy : Daljit Dosanjh shared winter care tips : दिलजीत दोसांझ थंडीच्या दिवसांत सर्दी - खोकल्यासाठी करतो अस्सल पारंपरिक देसी उपाय, चटकन मिळेल आराम...

प्रसिद्ध पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ नेहमीच आपला साधेपणा, विनोदबुद्धी आणि देसी लाईफस्टाईलमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. काही महिन्यांपूर्वीच सनी देओलने सोशल मिडीयावर एक टीझर शेअर करून 'बॉर्डर २' चित्रपटाची घोषणा केली होती. बॉलिवूड मधील ऐतिहासिक 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल म्हणजेच 'बॉर्डर २' (Border 2) मध्ये दिलजीत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिलजीत गाणी, चित्रपट आणि स्टायलिश लूक यांसोबतच तो अनेकदा आपल्या रोजच्या आयुष्यातील छोटे-छोटे क्षण देखील अगदी मनमोकळेपणाने सोशल मिडियावर शेअर करत असतो(Daljit Dosanjh winter care home remedy).

नुकतेच दिलजीत  दोसांझने २०२६ चे स्वागत एकट्याने, एका शांत ठिकाणी सहलीला जाऊन केले. ही ट्रिप जरी त्याच्यासाठी शांत आणि रिलॅक्सिंग असली, तरी ( Daljit Dosanjh cold and cough remedy) त्यात एक छोटी अडचण आली. सहलीदरम्यान दिलजीतला सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. अशावेळी बहुतांशजण लगेच दवाखाना गाठतात, मात्र दिलजीतने वेगळाच एक अस्सल पारंपरिक उपाय निवडला...औषधांऐवजी त्याने आजी-आजोबांच्या काळापासून केले जाणारे पारंपरिक उपाय करायचे ठरवले. विशेष म्हणजे, हे सगळे उपाय त्याने स्वतः आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले. त्यामुळे चाहत्यांना (Daljit Dosanjh shared winter care tips) दिलजीत दोसांझच्या किचनमधील देसी उपचारांचा थेट अनुभव घेता आला.

सर्दी - खोकला पळवून लावण्यासाठी दिलजीत करतो अस्सल पारंपरिक उपाय... 

१. सर्दी - खोकला कमी करणारे जादुई मिश्रण :- दिलजीत दोसांझने सर्वात आधी सर्दी-खोकल्यासाठी एक पारंपरिक मिश्रण तयार केले. या उपायामध्ये २ टेबलस्पून खसखस, २ टेबलस्पून किसलेले खोबरे, १ टेबलस्पून गूळ पावडर आणि १ टेबलस्पून साजूक तूप या साहित्याचा वापर करण्यात आला. हे मिश्रण अनेक घरांमध्ये खोकला, नाक वाहणे आणि शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी वापरले जाते. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दिलजीत दोसांझने हे मिश्रण कसे तयार करायचे ते सांगितले, आणि तो म्हणाला की हे मिश्रण मर्यादित प्रमाणातच खावे, कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट बिघडण्याची किंवा जुलाब होण्याची शक्यता असते. सर्वप्रथम खसखस मंद आचेवर कोरडी भाजून घ्या. त्यातून सुगंध येऊ लागेपर्यंत हलवत राहा. त्यात किसलेले खोबरे घालून थोडेसे परतून घ्या. नंतर गूळ पावडर घालून नीट मिसळा, गूळ वितळेपर्यंत ढवळत राहा. शेवटी तूप घालून सगळे साहित्य एकजीव होईपर्यंत शिजवा. थोडे थंड झाल्यावर हे मिश्रण खाण्यास तयार होते. हा उपाय खोकला, नाक वाहणे आणि थंडीमुळे आलेली अशक्तपणा कमी करण्यास मदत करतो, असे मानले जाते.

आईबाबा विसरू नका, ' या ' ५ प्रसंगी मुलांवर चिडू नका - ओरडू नका! चूक त्यांची नाही तुमची होईल कारण...

फर्टिलिटी वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीनं खजूर खा, डॉक्टरांचा महिलांना सल्ला-अशक्तपणाही होईल कमी... 

२. बेसनाचा शिरा :- दिलजीत दोसांझने आणखी एक लोकप्रिय आणि घरगुती पदार्थ तयार केला तो म्हणजे बेसनाचा शिरा. उत्तर भारतात बेसनाचा शिरा सर्दी-खोकल्याच्या काळात हमखास खाल्ला जातो. तो घशाला आराम देतो आणि शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. कढईत तूप गरम करा त्यात बेसन घालून मंद आचेवर सतत ढवळत राहा. बेसनाचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत भाजा. दुसऱ्या भांड्यात दूध कोमट करून ठेवा. भाजलेल्या बेसनात हळूहळू कोमट दूध घाला आणि गाठी पडू नयेत यासाठी सतत ढवळत राहा. त्यात साखर किंवा गूळ घालून नीट मिसळा. २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या. शिरा थोडा घट्ट झाला की वेलची पूड घाला.

दिलजीत दोसांजच्या या देसी उपायांना सोशल मिडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये “आजीचे जुने पारंपरिक उपाय आठवले”, “हे आम्ही लहानपणी खात होतो” अशा कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर हे उपाय लगेच करून पाहणार असल्याचेही सांगितले.आजच्या धावपळीच्या आयुष्यात लोक झटपट उपायांकडे वळतात. मात्र दिलजीतसारख्या सेलिब्रिटीने पारंपरिक आणि नैसर्गिक उपायांवर विश्वास दाखवल्यामुळे अनेकांना हे उपाय करुन पाहण्याची उत्सुकता तयार झाली. अर्थात, गंभीर आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असले तरी, साध्या सर्दी-खोकल्यासाठी घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. दिलजीत दोसांझने शेअर केलेले हे पारंपरिक देसी उपाय केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची आठवण करून देणारे आहेत. सर्दी-खोकल्याच्या दिवसांत आजीच्या बटव्यातील हे उपाय आजही तितकेच असरदार वाटतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Diljit Dosanjh's winter secret: Traditional Punjabi remedies for cold and cough.

Web Summary : Diljit Dosanjh shares traditional Punjabi home remedies for cold and cough, including khas khas mixture and besan sheera. He emphasizes natural solutions.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहिवाळाथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय