Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दहा मिनिटे चाला आणि..! सतत अपचन आणि मळमळ होत असेल तर वाचा हा तज्ज्ञांचा सल्ला

दहा मिनिटे चाला आणि..! सतत अपचन आणि मळमळ होत असेल तर वाचा हा तज्ज्ञांचा सल्ला

Walking after meals benefits: How to improve gut health naturally: Natural remedies for acidity: Walking for digestive health: 10-minute walk after meals for better gut health: पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय करायला हवे जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 11:38 IST2025-04-08T11:37:14+5:302025-04-08T11:38:01+5:30

Walking after meals benefits: How to improve gut health naturally: Natural remedies for acidity: Walking for digestive health: 10-minute walk after meals for better gut health: पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय करायला हवे जाणून घेऊया.

daily 10 minutes walking after meal how can improve gut health relief acidity gas problem doctor said | दहा मिनिटे चाला आणि..! सतत अपचन आणि मळमळ होत असेल तर वाचा हा तज्ज्ञांचा सल्ला

दहा मिनिटे चाला आणि..! सतत अपचन आणि मळमळ होत असेल तर वाचा हा तज्ज्ञांचा सल्ला

बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका वाढला आहे. या आजारांमध्ये सगळ्यात जास्त समावेश हा तरुणांचा आहे. हल्ली पोटाच्या विकारामुळे अनेकजण त्रस्त आहेत. डॉक्टर आपल्याला नेहमी शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहाण्यासोबत निरोगी आहार घेण्याचा सल्ला देतात. (How to improve gut health naturally)
चुकीचे खाणेपिणे, जंकफूड, चहा-कॉफीचे अतिरिक्त प्रमाणात सेवन, अपुरी झोप याचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होतो.(Natural remedies for acidity) शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्याने डिहायड्रेशनची समस्या होते.(Walking for digestive health) सतत मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने याचा पोटावर परिणाम होतो. ज्यामुळे आपल्याला मधुमेह, लठ्ठपणा, पोटाचे विकार आणि वाढत्या वजनाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (10-minute walk after meals for better gut health)

नॅशनल क्रश तृप्ती डिमरीसारखी सडपातळ कंबर हवी तर रोज सकाळी करा 'असा' व्यायाम, पाहा बदल

ॲसिडीटी झाल्यावर आपल्याला अस्वस्थ होते, डोके दुखी, मळमळणं हे सगळे त्रास सुरु होतात. काही खाण्याची इच्छा होत नाही. ज्यामुळे आपल्या पोटाच्या तक्रारी वाढतात. जर आपल्या शरीरात खराब बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असेल तर पोटाचे विकार वाढतात. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय करायला हवे जाणून घेऊया. 

">

डॉक्टरांच्या मते चालण्यामुळे जीआय सिस्टीमद्वारे अन्न पचण्याची हालचाल चांगल्या प्रमाणात होते. यामुळे सूज आणि अस्वस्थता कमी होते. 

चालण्यामुळे कॉर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे तणावामुळे होणाऱ्या आतड्यांसंबंधी समस्या इरिटेबल बोवेल सिंड्रोम आपल्याला टाळता येतो. 

जर आपल्याला शौचालयास तास होत असेल तर गट हेल्थची काळजी घ्यायला हवी. यासाठी नियमितपणे चालायला हवे. ज्यामुळे रक्तप्रवाह आणि आतड्यांसंबंधी क्रियाकलाप वाढतात. आतड्यांची हालचाल अधिक सुधारते. 

डॉक्टरांच्या मते चालण्यामुळे आपल्या आतड्यातील बॅक्टेरियांमध्ये विविधता येते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. 

जर जेवल्यानंतर आपण नियमितपणे १० मिनिटे शतपावली केली तर आरोग्याच्या एकूण तक्रारी कमी होतील. 

 

Web Title: daily 10 minutes walking after meal how can improve gut health relief acidity gas problem doctor said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.