Join us   

दह्यात मीठ घालून खावे की साखर? ९० टक्के लोक दह्याच्या सेवनात चुक करतात, आयुर्वेद सांगते की....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 8:37 AM

Curd Eating Benefits Salt Or Sugar What Is Beneficial : आयुर्वेदात असं सांगण्यात आले आहे की रात्रीच्यावेळी दही खाणं टाळायला हवं.

अनेकांना दही खायला आवडतं. ऊन्हाळ्याच्या दिवसांत दही, ताक मोठ्या प्रमाणात  खाल्ले जाते. काही लोक दह्यात मीठ मिसळून खातात  तर काहीजण साखर मिसळून  खातात.  (Health Tips) आरोग्याला भरपूर फायदे मिळण्यासाठी दह्यात मीठ मिसळायचं की साखर असा प्रश्न अनेकांना पडतो. डॉ. सर्वेश कुमार यांनी दही खाण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत एका हिंदी साईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Curd Eating Benefits Salt Or Sugar What Is Beneficial For Health)

आयुर्वेदात असं सांगण्यात आले आहे की रात्रीच्यावेळी दही खाणं टाळायला हवं. दह्याचे सेवन रोज करणार नाही याची काळजी घ्या. दह्याऐवजी मुगाची डाळ, मध, तूप, साखर आणि आवळा मिसळून खा. असं केल्याने आरोग्याला भरपूर फायदे मिळतात.

एक्सपर्ट्सच्यामते मीठात जेवणाची चव वाढवण्याची क्षमता असते. दह्यात थोडं मीठ घातले तर तब्येतीला कोणतंही नुकसान होत  नाही  ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास  मदत होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पाडतात. दह्यात नॅचरली एसिडीट असते. अनेकदा यामुळे पोटात गॅस तयार होतो. दह्यात जास्त मीठ  घालून खाणं टाळायला हवं. 

दातांना किड लागलीये-ब्रश करून उपयोग नाही? तज्ज्ञ सांगतात १ उपाय करा, पांढरे होतील दात

रोज दह्यात मीठ मिसळून खाल्ल्याने त्वचेच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. असं केल्याने हेअरफॉल, वयाआधीच केस पांढरे होणं, त्वचेवर पुळ्या येणं अशा समस्या उद्भवू शकतात. दह्यात मीठ घालून खाणं टाळायला हवं. दह्यात साखर मिसळून खाणं अधिक फायदेशीर ठरतं. दह्यात जेव्हा साखर मिसळली जाते तेव्हा थंड राहते. तब्येतीला कोणतंही नुकसान होत नाही.  दह्यात गूळ मिसळल्यानेही तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

डॉक्टरांच्यामते ज्यांचे ब्लड प्रेशर जास्त असते त्यांनी दह्यात मीठ मिसळणं टाळायला हवं. यामुळे स्ट्रोक,  उच्च रक्तदाब, मनोभ्रंश आणि हृदय रोगाच्या समस्या उद्भवू शकतात. दह्यात मीठ मिसळून प्यायल्याने त्यातील बॅक्टेरिया मरतात आणि पचनक्रिया बिघडते.

पोळपाट- लाटणं न वापरता गोल चपाती करण्याची १ सोपी ट्रिक; मशिनचीही गरज नाही- पाहा हाताची जादू

दही किंवा लस्सी पिणं फायदेशीर 

आयुर्वेदाचार्यांच्या मते दह्याची लस्सी बनवून प्यायल्याने उन्हाळ्यात शरीराला भरपूर फायदे मिळतात. दह्यात साखर मिसळून  याचे सेवन केल्याने ऊन्हाळ्यात तब्येतीच्या समस्या उद्भवत नाहीत. याशिवाय शरीराल एनर्जी येते. याशिवाय शरीर ताजंतवाने राहते. लस्सी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. म्हणून अधिक सेवन करू नये. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल