Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात फक्त दूध हळद नको, तर दुधात मिसळा ‘हे’ २ थेंब - जुनाट कफ आणि सर्दीखोकल्यावर घरगुती उपाय...

हिवाळ्यात फक्त दूध हळद नको, तर दुधात मिसळा ‘हे’ २ थेंब - जुनाट कफ आणि सर्दीखोकल्यावर घरगुती उपाय...

cough home remedy how to get rid of cough with this amazing ajwain & turmeric milk recipe : how to get rid of cough naturally : best home remedy for cough : नेहेमीचेच हळदीचे दूध अधिक गुणकारी आणि असरदार व्हावे यासाठी यात काय मिसळावे, जेणेकरून सर्दी - खोकला होईल दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 14:28 IST2025-12-01T14:25:27+5:302025-12-01T14:28:18+5:30

cough home remedy how to get rid of cough with this amazing ajwain & turmeric milk recipe : how to get rid of cough naturally : best home remedy for cough : नेहेमीचेच हळदीचे दूध अधिक गुणकारी आणि असरदार व्हावे यासाठी यात काय मिसळावे, जेणेकरून सर्दी - खोकला होईल दूर...

cough home remedy how to get rid of cough with this amazing ajwain & turmeric milk recipe how to get rid of cough naturally : best home remedy for cough | हिवाळ्यात फक्त दूध हळद नको, तर दुधात मिसळा ‘हे’ २ थेंब - जुनाट कफ आणि सर्दीखोकल्यावर घरगुती उपाय...

हिवाळ्यात फक्त दूध हळद नको, तर दुधात मिसळा ‘हे’ २ थेंब - जुनाट कफ आणि सर्दीखोकल्यावर घरगुती उपाय...

हिवाळ्यात गारठा वाढला की त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. सर्दी, कफ आणि सततचा खोकला ही थंडीच्या दिवसांतील लहान - सहान आजारपण नकोशी वाटू लागतात. हिवाळ्यात बरेचदा वातावरणातील वाढत्या गारठयाने खोकला, सर्दी, घसा खवखवणे यांसारख्या समस्या वरचेवर त्रास देतात. या लहान - सहान आजारांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक पिढ्यांपासून चालत आलेला आपला पारंपरिक आणि सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे हळदीचे दूध पिणे. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन आणि दुधातील पोषण यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि घशाला आराम मिळतो(cough home remedy how to get rid of cough with this amazing ajwain & turmeric milk recipe).

सर्दी - खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून असरदार असलेलं हळदीचे दूध म्हणजेच 'गोल्डन मिल्क' मध्ये आणखी दोन विशिष्ट पदार्थ मिसळले, तर त्याची गुणकारिता अनेक पटींनी वाढते....हे पदार्थ हळदीच्या दुधाला फक्त अधिक चवदारच करत नाहीत, तर खोकला आणि कफचा त्रास मुळापासून कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. हळदीचं दूध आणखी अधिक गुणकारी, फायदेशीर आणि त्वरीत आराम देणारं बनवता येतं… फक्त त्यात दोन खास पदार्थांची भर घालून! कोणते आहेत हे दोन पदार्थ आणि ते खोकला-घसा बरे करण्यात कसे मदत करतात, ते पाहूयात... हिवाळ्यात होणाऱ्या खोकल्यावर असरदार ठरणाऱ्या, अधिक गुणकारी हळदीचे (best home remedy for cough) दूध तयार करण्यासाठी त्यात कोणते दोन खास पदार्थ मिसळावेत आणि त्याचे फायदे काय आहेत, ते पाहूयात... 

हळदीच्या दूधात ओव्याचा अर्क आणि काळीमिरी दाणे घालणे का आहे फायदेशीर... 

१. फुफ्फुसांची स्वच्छता :- ओवा हे कार्बनोल नावाचे एक प्रकारचे संयुंग आहे, जे कफ वितळवून बाहेर काढण्यास मदत करते. जेव्हा हा पदार्थ हळदीच्या दुधात मिसळला जातो, तेव्हा तो श्वसन नलिकांमधील जुना कफ देखील हळूहळू बाहेर काढायला लागतो. ओवा छातीतली कफ बाहेर काढण्यासाठी फायदेशीर तर ठरतोच, सोबतच आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल देखील कमी करण्यास मदत करतो. 

२. घशाची सूज आणि वेदनेतून आराम :- जुनाट आणि दीर्घकाळ असलेला खोकला घशात सूज निर्माण करतो. हळदीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म फार मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा ओव्याचा अर्क यात मिसळतो, तेव्हा हे मिश्रण सूज आणि खोकला त्वरित कमी करते.

सतत गॅस-अ‍ॅसिडीटीच्या त्रासाने हैराण? डॉक्टर सांगतात फक्त ३ फळं खा, पोटाला बरे...

३. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते :- हळदीत असलेले अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराला संसर्गाशी लढण्याची शक्ती देतात. ओवा पचनशक्ती मजबूत करून शरीराला आतून ऊर्जा देते आणि वारंवार होणारा खोकला कमी होण्यास सुरुवात होते.

४. जुन्या ॲलर्जी खोकल्यावर परिणामकारक :- आपल्यापैकी अनेकांना वारंवार होणारा खोकला किंवा खोकल्यामुळे होणारी ॲलर्जी यांचे प्रमाण प्रामुख्याने थंडीच्या दिवसांत जास्त प्रमाणात वाढते. हळदीच्या दुधात काळीमिरी व ओवा घातल्यास श्वसनलिका स्वच्छ होऊन जमा झालेली सूज कमी करते. असे हळदीचे दूध नियमित प्यायल्याने श्वसन मार्ग सुधारण्यास मदत होते.

भाग्यश्री आणि कतरीना कैफला आवडते हिवाळ्यातील खास फळ! दररोज न चुकता खातात - फळं एक फायदे अनेक... 

५. झोपल्यावर खोकल्याची धास लागते :- बहुतेकवेळा आपल्याला झोपल्यावरच जास्त प्रमाणात खोकला येतो, ज्यामुळे झोपमोड होते. हळदीचे दूध थकलेल्या चेतासंस्थेला (Nervous System) शांत करते, ज्यामुळे चांगली झोप लागते आणि रात्रीचा खोकला कमी होतो. 

सर्दी - खोकला कमी करण्यासाठी हळदीच्या दुधात काय मिसळावे ? 

एक ग्लास गरम दूध घ्या त्यात पाव चमचा हळद पावडर घाला. उकळी आल्यावर गॅस बंद करा. आता यात २ थेंब ओव्याचा अर्क मिसळा किंवा पाव चमचा ओव्याची पावडर देखील घालू शकता इतकेच नाही तर आपण यात काळीमिरीचे १ ते २ दाणे किंवा चिमूटभर काळीमिरी पूड मिसळू शकता.

Web Title : हल्दी दूध में अजवाइन, काली मिर्च: खांसी, सर्दी के लिए उपाय।

Web Summary : हल्दी दूध में अजवाइन का अर्क और काली मिर्च मिलाने से इसके फायदे बढ़ जाते हैं। अजवाइन बलगम साफ करने और सूजन को कम करने में मदद करता है। काली मिर्च रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाती है, खांसी से राहत देती है।

Web Title : Turmeric milk with ajwain, black pepper: Remedy for cough, cold.

Web Summary : Adding ajwain extract and black pepper to turmeric milk boosts its benefits. Ajwain helps clear mucus, reduces inflammation. Black pepper enhances immunity, eases cough.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.