काही वर्षांपुर्वी अशी परिस्थिती होती की काही विशिष्ट आजार फक्त पन्नाशी, साठीनंतरच दिसायचे. जसं की गुडघेदुखी, मधुमेह, बीपी, हृदयरोग, नजर अंधूक होणे.. पण आता तर हे सगळे आजार अगदी कमी वयातच मागे लागत आहेत. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप अशी सतत स्क्रिन पाहिल्यामुळे तर कित्येक लहान मुलांचे डोळे खराब होत आहेत. नजर कमी होत आहे. त्यामुळे कमी वयात चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आता यामध्येच कॉर्नियल ब्लाईंडनेस या आणखी एका आजाराचीही भर पडली आहे. पुर्वी पन्नाशी, साठीनंतर हा आजार दिसायचा (What Is Corneal Blindness?). पण आता मात्र अवघ्या तिशीच्या आसपास असणाऱ्या तरुणाईलाही डोळ्यांचा हा आजार होत असून यामुळे चक्क अंधत्व येत आहे.(symptoms and causes of corneal blindness)
इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया आणि केरॅटो रिफ्रेक्टीव्ह सर्जन यांची एक परिषद दिल्ली येथे नुकतीच पार पडली. या परिषदेमध्ये झालेल्या चर्चेनुसार भारतात आता कॉर्नियल ब्लाईंडनेस या आजाराचे २० ते २५ हजार रुग्ण दरवर्षी आढळून येत आहेत.
नारळीभात नेहमी फसतो-कधी गचका तर कधी फडफडीत होतो? पाहा नारळीभात करण्याची परफेक्ट रेसिपी
आता भारतामध्ये अंधत्व येण्याचे हे एक दुसरे मोठे कारण झाले आहे. या आजारामध्ये कॉर्नियावर पांढरा डाग तयार होत जातो. वाढते वय, डोळ्याला मार लागणे, संसर्ग होणे, स्टेरॉईडचा जास्त वापर अशा कारणांमुळे हा आजार होतो. त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष झालं तर आजार वाढत जातो आणि त्यामुळे अंधत्व येतं. भारतात कमी वयाच्या लोकांना हा आजार होण्याचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे.
याविषयी तज्ज्ञ असं सांगतात की डोळ्यांना कोणताही संसर्ग झाला, किंचित अंधूक दिसायला लागलं, डोळ्यातून सतत पाणी येणं किंवा डोळे लाल होणं असा त्रास झाल्यास दुर्लक्ष करू नका.
हा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय करण्यापेक्षा लगेचच तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्यांसाठी पोषक असणारे व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ जास्तीतजास्त प्रमाणात खा.