मुलांचं लक्ष अभ्यासात नसेल तर किंवा त्यांना पोटाच्या समस्या वारंवार उद्भवत असतील तर प्रेमानंद महाराजांनी एक सोपा उपाय सांगितला आहे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली राहते. रोज सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानं फक्त पचनक्रिया सुधारत नाही तर मेंदूसुद्धा सुपरएक्टिव्ह होतो. (Copper Water Benefits For Kids Brain and Digestion)
प्रेमानंद महाराज कोणता सोपा उपाय सांगतात
प्रेमानंद महाराजांनी एक मॉर्निंग रूटीन सांगितलं आहे. ज्यात फक्त तांब्याच्या भांड्यात पाणी पिणंच नाही तर इतर काही चांगल्या सवयींचाही समावेश आहे. रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी वज्रासनात बसून हळूहळू प्या, नंतर वॉक करण्यासाठी जा. शौचायलास जाऊन नंतर १० मिनिटं हलका व्यायाम करा. त्यानंतर अभ्यास करण्यास बसा. ज्यामुळे जास्त फायदा होईल. प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार या सवयी मुलांना मेंटली फिट आणि एक्टिव्ह राहण्यास मदत करतील.
आयुर्वेदात वज्रासन सगळ्यात चांगली मुद्रा मानली गेली आहे. पाणी व्यवस्थित प्यायल्यानं पचनक्रिया दुप्पट वेगानं वाढते. शरीरात एनर्जीचा फ्लो चांगला राहतो. वज्रासनात बसून पाणी प्यायल्यानं पोट आणि मेंदू शांत राहतो. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलंल पाणी प्यायल्यानं शरीराचे आतडे स्वच्छ होतात. ताण-तणाव कमी होण्यासही मदत होते.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याला ताम्रजल म्हणतात. आयुर्वेदानुसार तांब्यातील पाणी त्रिदोष नाशक आहे. यामुळे वात, पित्त, कफ दोष संतुलित राहतो. WHO नुसार रोज जवळपास २ मिलीग्राम पाणी प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. तांब्यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ते ब्रेन आणि डायजेशनसाठी फायदेशीर ठरतं.
या भांड्यात पाणी प्यायल्यानं मेंदू वेगानं चालतो, इम्यूनिटी चांगली राहते, पोट साफ राहतं आणि मूडही चांगला राहण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स होतं आणि मन शांत राहण्यास मदत होते. गॅसच्या समस्या उद्भवत नाहीत. कॉपर न्युरोट्रांसमीटर्स बॅलेंस करतात ज्यामुळे फोकस आणि मेमरी चांगली राहते.