काही जणांना पाेट साफ व्हायला नेहमीच वेळ लागतो. काही केल्या पोट लवकर साफ होत नाही. कोणताही ऋतू असला तरी त्यांचा हा त्रास कायम असतो. असा त्रास तुम्हालाही होत असेल तर दोन पदार्थ खाणं अतिशय उत्तम ठरू शकतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास नेहमीसाठीच कमी होण्यास मदत होऊ शकते, असं आयुर्वेदिक डॉक्टर सांगत आहेत (how to get rid of constipation?). ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पद्धतीने खायला हवे, ते आता पाहूया..(food that helps for better digestion)
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठी उपाय
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवे, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यांनी सांगितलेले दोन उपाय पुढीलप्रमाणे..
केस एवढे वाढतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल; करून पाहा 'हा' उपाय- केस गळणं बंद होईल
१. किवी
आयुर्वेदतज्ज्ञ असं सांगत आहेत की बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी दररोज २ किवी नियमितपणे खाऊन पाहा. किवीमध्ये ॲक्टीइडीन हे एन्झाईम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. या दोन्ही गोष्टी पचनक्रिया आणि चयापचय क्रिया उत्तम होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मग पोट लवकर साफ होते.
२. सुके अंजीर
पोट लवकर साफ होण्यासाठी उपयुक्त ठरणारा दुसरा पदार्थ आहे सुके अंजीर. दररोज रात्री २ ते ४ अंजीर पाण्यामध्ये भिजत घालावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते खावेत.
चमचाभर तांदूळ घेऊन करा 'हा' उपाय, त्वचेवर येईल सुंदर ग्लो; विकतचं क्रिम लावण्याची गरजच नाही
त्यासोबतच अंजीर ज्या पाण्यात भिजत घातलेले असते ते पाणीही प्यावे. अंजीरामध्येही फायबर आणि सॉल्यूबल फॅट जास्त प्रमाणात असतात जे पचनासाठी मदत करतात. शिवाय अंजीर हे स्निग्ध असतात. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी त्यांची मदत होते.