Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत उष्णतेचा त्रास होतो? 'हा' एक पदार्थ आहारात हवाच, उष्णतेच्या सर्व समस्यांना म्हणा टाटा- बायबाय!

सतत उष्णतेचा त्रास होतो? 'हा' एक पदार्थ आहारात हवाच, उष्णतेच्या सर्व समस्यांना म्हणा टाटा- बायबाय!

Constantly suffering from heat? 'This' one food is a must in your diet, say goodbye to all heat problems : उष्णतेचा त्रास होत असेल तर स्वयंपाकघरातील हा एक पदार्थ ठरेल फायद्याचा. पाहा कोणता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2025 18:46 IST2025-05-12T18:45:10+5:302025-05-12T18:46:22+5:30

Constantly suffering from heat? 'This' one food is a must in your diet, say goodbye to all heat problems : उष्णतेचा त्रास होत असेल तर स्वयंपाकघरातील हा एक पदार्थ ठरेल फायद्याचा. पाहा कोणता.

Constantly suffering from heat? 'This' one food is a must in your diet, say goodbye to all heat problems | सतत उष्णतेचा त्रास होतो? 'हा' एक पदार्थ आहारात हवाच, उष्णतेच्या सर्व समस्यांना म्हणा टाटा- बायबाय!

सतत उष्णतेचा त्रास होतो? 'हा' एक पदार्थ आहारात हवाच, उष्णतेच्या सर्व समस्यांना म्हणा टाटा- बायबाय!

अनेक प्रकारचे आजार तर असतातच मात्र इतरही काही गोष्टी असतात ज्यांचा त्रास सातत्याने उद्भवतो. जसे की एखाद्याला सारखी कसली ना कसली ऍलर्जी होते. (Constantly suffering from heat? 'This' one food is a must in your diet, say goodbye to all heat problems)काहींना सारखा थकवा जाणवतो. कोणत्या तरी सत्वाची कमतरता असते. त्याच प्रकराचा एक त्रास म्हणजे उष्णतेचा. काहींच्या शरीरात उष्णता फार असते. अर्थात हा काही आजार नाही. मात्र त्याचा त्रास नक्कीच होतो. सारखे पित्त होते. काही खाल्यावर मळमळते. उलट्या होतात. उन्हाळ्यात तर विचारुच नका. औषधे घेतली तरी पुन्हा असा त्रास होतोच. (Constantly suffering from heat? 'This' one food is a must in your diet, say goodbye to all heat problems)उष्णता शरीराबाहेर पडण्यासाठी विविध मार्ग शोधते. 

उलट्या होतात, अंगावर फोड उठतात. तसेच डोके दुखते पोट खराब होते. विविध त्रास होतात. त्याच प्रमाणे काहींना पित्त आणि उष्णता अंगावर उठते म्हणजेच त्वचा फुगते लाल होते अंगाला खाज सुटते आणि जळजळ होते. असे काही झाल्यावर लोकं घाबरून जातात. मात्र त्यात घाबरण्याची काही गरज नाही. काही उपाय आहेत जे केल्याने अंगावर उठणारे लहान फोड आणि लालसर रॅश लगेच बरे होतात. जर सतत असे पित्त अंगावर उठत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपाय करुन घ्या. पित्ताच्या त्रासाबद्दल आपण फार गंभीर विचार करत नाही. मात्र पित्ताचा त्रास वाढणे चांगले नाही.  योग्य वेळेत उपाय करुन घ्या. 

 अंगावर पित्त उठल्यावर खुपच खाज सुटते मात्र संयम ठेवणे फार गरजेचे असते. खाजवल्याने फोडांची संख्या वाढते. रॅश उठतात. त्यामुळे खाजवणे टाळा. घरी आमसुल असतेच त्याचा वापर करुन हा त्रास कमी करता येतो. कोकम आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोकमाचा आगळ तसेच कोकम सरबत प्यायले जाते. कोकमाचे तेल मिळते ते लावल्याने उष्णतेमुळे फुटलेले पाय तसेच ओठही बरे होतात. त्यामुळे कोकमाचा वापर करणे पित्तशामक ठरते. आमसुल पाण्यात भिजवायचे. त्याचा रस काढायचा. पाण्यात आमसुल चुरायचे आणि त्या पाण्याने पित्त उठलेल्या ठिकाणी मसाज करायचा. तसेच आमसुलाचा चोथा हातात घेऊन अंगावर घासायचा. 

पित्ताचा, उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी आहारात आमसुलाचा समावेश करुन घ्यावा. वरणात, आमटीत, भाजीत आमसुलाचा तुकडा घातल्याने पोटाला थंडावा मिळतो. तसेच छान कोकम सरबत प्यावे. उष्णता उठायला लागली की काही मिनिटातच अंगभर पसरते त्यामुळे असे उपाय लगेच करावे जेणेकरून त्रास जास्त वाढणार नाही. जर घरगुती उपाय चालले नाहीत तर मग वेळीच डॉक्टरांकडे जाऊन या.  

Web Title: Constantly suffering from heat? 'This' one food is a must in your diet, say goodbye to all heat problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.