Join us

सतत खाज-त्वचा कोरडी? तुम्हाला त्वचाविकार तर झालेला नाही? पाहा स्किन दिसते कशी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2024 08:00 IST

त्वचाविकार लवकर बरे होत नाही, वेळीच काळजी घ्या

ठळक मुद्दे आपल्या मानसिक शारीरिक आजाराची लक्षणं आपल्या त्वचेवर दिसतातच. तसं आपलंही होतं का, तपासा..

त्वचेचे विकार अनेकांना छळतात. पण त्याकडे दुर्लक्ष हाेते. वरवर सुंदर दिसणाऱ्या व्यक्तींनाही त्वचाविकार असू शकतात. आणि त्वचेचे आजार लवकर बरेही होत नाही. खरं तर सामान्य तरुणांपासून सर्वांनाच आपण सुंदर दिसावं असं वाटतं. मात्र त्वचा आपलं वय सांगते आणि आपले आजारही. आपल्या मानसिक शारीरिक आजाराची लक्षणं आपल्या त्वचेवर दिसतातच. तसं आपलंही होतं का, तपासा..

कशामुळे होतात त्वचेचे विकार? १. सतत जंक फूड खाणे. २. अस्वच्छता. हायजिनची काळजी न घेणे. ३. सतत धूळ व प्रदूषणाचा त्रास. ४. संसर्गजन्य त्वचाविकार ५. खूप घाम येणे, आंघोळ न करणे.  ६. अती केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनं वापरणे.  ७. मानसिक ताण ८. शारीरिक विकार आणि आजाराचा परिणाम.

(Image :google)

लक्षणं कोणती? १. त्वचेला खाज-कोरडेपणा. २. त्वचेचा काहीभाग लालसर होणे, आग होणे. ३. मूळ रंग बदलणे ४. दुर्गंधी येणे.

 

(Image : google)

काळजी काय घ्याल? १.आंघोळीनंतर किंवा घाम आल्यानंतर त्वचा ओलसर असल्यास कोरडी करणे. पावडर वापरणे. २. त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे ३.त्वचा नितळ व निरोगी राहण्यासाठी आहारदेखील पोषक असावा. ४. चांगले मॉइश्चरायझर वापरा. ५. भरपूर पाणी प्या.  

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइलत्वचेची काळजी