आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लिव्हर.(Health tips) ते निरोगी ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत भाग आहे.(Signs of liver disease) लिव्हर हे आपल्या शरीरात पित्त तयार करण्याचे काम करते. पचनसंस्था सुरळीत करण्याचे कार्य लिव्हरवर अवलंबून असते.(Swollen legs liver problem) यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होतात. (Liver disease early symptoms)
लिव्हर आपल्या शरीरातील प्रथिने, कोलेस्टेरॉल आणि हार्मोन्ससह अनेक महत्त्वाच्या गोष्टी बनवण्यास मदत करतात.(Itchy legs and liver health) आपल्या रोजच्या जीवनशैलीत सकस आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. पचन सुधारण्याचे आणि शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते.(Liver failure symptoms) त्यासाठी यकृत निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे. लिव्हर कमकुवत झाल्यास किंवा योग्यरित्या काम करत नसल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. लिव्हर खराब झाल्याची लक्षणे आपल्या शरीरावर विविध पद्धतीने दिसतात.(How to detect liver problems) या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला जीव देखील गमावावा लागू शकतो. लिव्हरला नुकसान करणाऱ्या लक्षणांबद्दल समजून घेऊया.
डाळिंबाची सालं ठेवतील तरुण! पिंपल्स, सुरकुत्या, डागांची समस्या होईल दूर- चेहऱ्यावर चकाकता ग्लो
1. पायांना सूज येणे
लिव्हर खराब झाल्यानंतर त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. लिव्हर योग्यरित्या काम करत नसेल तेव्हा पायांना सूज येते. खराब झालेल्या यकृतामुळे शरीरात द्रवपदार्थांचे प्रमाण वाढू लागते.ज्यामुळे पाय आणि घोट्यांमध्ये सूज येते. चालताना किंवा उठताना-बसताना पायात वेदना जाणवतात. ही सूज कमी जास्त होऊ लागली की ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
2. पायांना खाज सुटणे
जेव्हा आपली लिव्हर खराब होते तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडत नाही. अशावेळी हाता-पायांवर पुरळ येतात. याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील दिसू लागतो. यामुळे पायांना खाज सुटणे, जळजळ होणे किंवा पुरळ उठू लागतात. यासोबतच त्वचा कोरडी आणि खडबडीत होते.
वारंवार लघवी लागते, जळजळ- वेदनाही होतात? ५ पदार्थ नियमित खा, युरिन इन्फेक्शन त्रास होतो कमी
3. पायांच्या नसा निळ्या-जांभळ्या होणे
आपली लिव्हर खराब झाल्यावर त्याच्यावर निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे डाग दिसू लागतात. यावेळी रक्ताच्या गाठी तयार होऊन पायांवर परिणाम होतो. यामुळे अनेकदा पाय दुखत नसले तरी देखील नसा फुगतात किंवा निळ्या-हिरव्या होतात. पायांवर वारंवार हे डाग दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.