Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत टाच दुखते, बरीच होत नाही? पाहा टाच दुखण्याची कारणे आणि उपाय

सतत टाच दुखते, बरीच होत नाही? पाहा टाच दुखण्याची कारणे आणि उपाय

Constant heel pain, not getting better? See the causes and remedies for heel pain : सारखी टाच दुखत असेल तर पाहा काय कारणे असू शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 18:08 IST2025-05-09T18:06:58+5:302025-05-09T18:08:45+5:30

Constant heel pain, not getting better? See the causes and remedies for heel pain : सारखी टाच दुखत असेल तर पाहा काय कारणे असू शकतात.

Constant heel pain, not getting better? See the causes and remedies for heel pain | सतत टाच दुखते, बरीच होत नाही? पाहा टाच दुखण्याची कारणे आणि उपाय

सतत टाच दुखते, बरीच होत नाही? पाहा टाच दुखण्याची कारणे आणि उपाय

अचानक टाच दुखायला लागली? एकदा का टाचदुखी सुरू झाली की मग सारखी टाच दुखतेच. चालताना त्रास होतोच मात्र बसल्यावरही बेचैन व्हायला होतं. हात सतत टाचेच्या दिशेने जातो. पायावर जरा बोटांनी जोर दिला की बरं वाटतं मात्र मग पुन्हा जैसे थे.(Constant heel pain, not getting better? See the causes and remedies for heel pain) टाच ठणकायला लागते. टाच दुखण्यामागे काही कारणे असू शकतात.  जसा मधेच पाय दुखतो पोटरी दुखते तसेच टाचही दुखते असे समजून आपण टाच दुखीकडे दुर्लक्ष करतो. मात्र टाच दुखीची अनेक कारणे असू शकतात आणि वेळीच उपाय नाही केला तार टाचेला दुखापत होऊ शकते. टाच दुखण्याची काही कारणे असतात. 

२. थोडे चालल्यावर किंवा काही काम केल्यावर एखादी वस्तू उचलल्यावर टाच दुखायला लागते. त्याचे मुख्य कारण म्हणजे वजन. वजन जास्त असेल तर टाचेवरच शरीराचा भार येतो. जास्तीचे वजन टाचेला झेपत नाही. त्यामुळे लठ्ठपणा कमी करणे गरजेचे आहे. 

३. काही जणांना त्यांचे काम करताना सतत उभे राहावे लागते. जसे की शिक्षकी पेशा असेल तर शिकताना उभे राहून किंवा फेऱ्या मारुन शिकवले जाते. (Constant heel pain, not getting better? See the causes and remedies for heel pain)जास्त वेळ सपाट पृष्ठभागावर स्थिर उभे राहिल्याने पायावर ताण येतो. पायावर ताण आल्याने टाच दुखायला लागते. जास्त वेळ चालल्यावर जसे तळवे दुखतात तसेच जास्त वेळ उभ राहिल्याने पायाची टाच दुखायला लागते. त्यामुळे काम करताना मध्ये थोडा वेळ बसायची सवय लावा. पायांना आराम द्या. 

४. कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता असेल किंवा कॅल्शियम कमी असेल तरी टाचा दुखतात. शरीराला एखाद्या गुणधर्माची कमतरता जाणवल्यावर शरीराची प्रतिक्रिया येते त्यामुळे अवयव कमकुवत होतात. स्नायु कमकुवत झाल्याने टाच दुखते. आहार चांगला ठेवा तसेच ज्या सत्वाची कमतरता आहे त्यासाठी योग्य उपाय करा. 

५. चपल घातल्याशिवाय आपण घराबाहेर जात नाही. चपलांमध्ये भरपूर प्रकार असतात. फॅशन करण्यासाठी हिल्स किंवा इतर प्रकारच्या चुकीच्या चपला वापरल्या जातात. चपलेच्या आकारामुळे किंवा मटेरियलमुळे टाचा दुखतात. कारण टाचेवर चपल चांगली नसेल तर भार येतो. चांगल्या सपाट चपला वापरायला सुरवात करा. चपलेचा आकार-वजन तपासूनच चपल घ्या.  

ही काही साधी कारणे झाली. मात्र इतरही काही गंभीर आजारांमुळेही टाच दुखते. त्यामुळे डॉक्टरांकडे वेळीच जाऊन या.  योग्य वैद्यकीय उपचार करुन घ्या. 

Web Title: Constant heel pain, not getting better? See the causes and remedies for heel pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.