पाय, पोट, पाठ, हात यांसारख्या अवयवांमध्ये क्रॅम्प येणे ही अत्यंत सामान्य तक्रार आहे. अचानक येणारी आकडी, स्नायूंची घट्ट पकड आणि वेदना काही क्षणातच व्यक्तीला त्रस्त करुन टाकते. काही वेळा क्रॅम्प काही सेकंदात जातात, तर काही प्रसंगी त्या स्नायूला पुन्हा मोकळे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. (Constant cramps in the legs are a big risk of serious disease, see the solution )शरीराच्या कोणत्याही स्नायूमध्ये क्रॅम्प येऊ शकतो, परंतु त्यामागे काही निश्चित कारणे असतात. पायात गोळा येणे, मान दुखायला लागणे, स्नायू ताणले जाणे या सारख्या होणाऱ्या त्रासांची कारणे जाणून घ्या.
सगळ्यात सामान्य कारण म्हणजे स्नायूंना पुरेशी विश्रांती न मिळणे. सतत उभे राहणे, जास्त चालणे, किंवा अतिशय कष्टाचे व्यायाम केल्यावर स्नायू थकतात आणि अचानक दपखायला लागतात. याशिवाय पाण्याची आणि इलेक्ट्रॉलाइट्सची कमतरता खास करून सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कमी झाल्यास स्नायू नीट आकुंचन-विस्तारण करू शकत नाहीत. उष्ण हवामानात घाम जास्त येणे, दिवसभर पुरेसे पाणी न पिणे किंवा अतिशय डिहायड्रेशन हेही क्रॅम्पचे प्रमुख कारण ठरते.
कधीकधी रक्तपुरवठा कमी होणे किंवा एखादा अवयव एकाच स्थितीत खूप वेळ ठेवणे जसे बसून राहणे, पायावर पाय ठेवून बसणे यामुळेही क्रॅम्प येतात. व्हिटॅमिन 'बी'ची कमतरता, थायरॉईड असंतुलन, लोहाची कमी किंवा गर्भावस्था यामध्येही स्नायू अधिक संवेदनशील होतात. काही औषधांचे (विशेषतः डाय्युरेटिक्स) दुष्परिणामही क्रॅम्पच्या रूपाने दिसू शकतात.
क्रॅम्प कमी करण्यासाठी घरच्या घरी करायला सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. सर्वप्रथम तो स्नायू हळूच ताणून मोकळा करणे जसे पायाला क्रॅम्प आला तर पाय सरळ करून बोटे आपल्या दिशेने हलके ओढणे. गरम पाण्याचा शेक दिल्यास स्नायू रिलॅक्स होतो आणि वेदना कमी होते. दिवसातून पुरेसे पाणी पिणे, नारळपाणी, लिंबूपाणी यांसारख्या इलेक्ट्रॉलाइट्सयुक्त पेयांचा वापर केल्यास शरीरातील क्षारांचे संतुलन सुधारते. आहारात केळी, सुका मेवा, डाळी, दही, भाज्या, तीळ यांसारखे पोटॅशियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थ घेतल्यास स्नायू अधिक मजबूत होतात.
झोपण्यापूर्वी पायांना हलके मालीश करणे, दिवसभर खूप वेळ एकाच स्थितीत न राहणे, आणि व्यायामाआधी आणि नंतर स्ट्रेचिंग करणेही आवश्यक आहे. सतत येणारे किंवा वारंवार रात्री होणारे क्रॅम्प कधी कधी शरीरातील पोषणअभावाचे संकेत असू शकतात, त्यामुळे ते नियमित होत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणे चांगले.
Web Summary : Leg cramps are common due to dehydration, exertion, or electrolyte imbalance. Home remedies include stretching, massage, and hydration. Persistent cramps may indicate an underlying health issue, requiring medical advice.
Web Summary : पानी की कमी, थकान या इलेक्ट्रोलाइट असंतुलन के कारण पैरों में ऐंठन आम है। घरेलू उपचार में स्ट्रेचिंग, मालिश और जलयोजन शामिल हैं। लगातार ऐंठन एक अंतर्निहित स्वास्थ्य समस्या का संकेत हो सकता है, जिसके लिए चिकित्सा सलाह की आवश्यकता होती है।