गरमागरम वरण भात आणि साजूक तुपाची धार याशिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे.(Dal Cooking Mistake) महाराष्ट्रातील अनेक भागात जसे भाताचे विविध प्रकार आहेत तसेच डाळींचे देखील.(Right Way to cook Dal) विविध डाळींपासून गोडाचे- तिखटाचे पदार्थ केले जातात.(Idigestion from dal) मूग, मसूर, चण्याची डाळ, उडीदाची डाळ, तूर डाळ या सगळ्यांपासून अनेक खमंग आणि चविष्ट पदार्थ केले जातात. या डाळी रोजच्या जेवणातील महत्त्वाचा भाग आहेत.(healthy dal recipe tips) यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन असते. सगळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाणारी डाळ अर्थात तूर डाळ. कधी तिखट तर कधी जिऱ्याची फोडणी देऊन याची चव वाढवली जाते. अनेक गंभीर आजारांमध्ये काही डाळी औषधांचं काम करतात पण डाळ शिजवण्याची पद्धत चुकली की आपल्याला अपचन, पित्त आणि पोटदुखीचा त्रास सुरु होतो.
गणपती बाप्पाच्या नैवैद्यासाठी करा गुलाबी उकडीचे मोदक, सुंदर गोडगुलाबी मऊ मोदक करण्याची सोपी ट्रिक
अनेकदा डाळ खाल्ल्यानंतर आपल्याला पोट फुगल्यासारखे किंवा गॅसेसच्या समस्या जाणवतात. डाळीमध्ये असे काही घटक असतात जे पचण्यास कठीण असतात. पण जर डाळ योग्य पद्धतीने बनवली तर अपचन आणि पित्ताचा त्रास कमी होईल. याविषयीची माहिती पोषणतज्ज्ञ दीपशिखा जैन यांनी दिली. डाळ शिजवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, जाणून घेऊया.
पोषणतज्ज्ञ म्हणतात मसूरची डाळ बनवण्यापूर्वी किमान ७ ते ८ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. तर राजमा, चणे १२ तास तरी पाण्यात भिजवायला हवे. मसूरमध्ये फायटिक अॅसिड नावाचे अँटी-न्यूट्रिएंट आढळते. जर डाळ न भिजवता शिजवल्यास आपल्याला अपचन, गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तसेच यात असणारे लोह आणि जस्त सारखे पोषक घटक शरीराला मिळणार नाही. मसूरची डाळ भिजवल्यानंतर ती व्यवस्थित शिजण्यासही मदत होते.
अनेकदा डाळ लवकर शिजत नाही. कुकरच्या कितीही शिट्ट्या मारल्या तरी ती कच्ची राहते. अशावेळी डाळ भिजवताना पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर घाला. यामुळे डाळ नीट शिजण्यास आणि पचण्यास मदत होते. यात असणारे अँटी-न्यूट्रिएंट घटक कमी होऊन पचनसंस्था सुरळीत होण्यास मदत करते. असं केल्याने डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या होणार नाही.