Join us   

Cholesterol Balance Tips : कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत असू शकतात त्वचेतील हे बदल; गंभीर आजार वाढण्याआधीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 12:01 PM

Cholesterol Balance Tips : बाहेरचं जास्त खाल्ल्यानं एडेड शुगर, अतिरिक्त तेल, सॅच्यूरेडेट फॅट्स शरीराचं नुकसान करतात.

कोरोना व्हायरसमुळे आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. ऑनलाईन क्लास, वर्क फ्रॉम होम यामुळे लोकांना पुरेशी झोप घेता येत नाही. वेळेचा अभाव आणि अति ताण, थकवा आल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. घरी जेवण बनवणं लोकांना शक्य होत नाहीये. बाहेरचं जास्त खाल्ल्यानं एडेड शुगर, अतिरिक्त तेल, सॅच्यूरेडेट फॅट्स शरीराचं नुकसान करतात.

शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या हृदयाच्या आरोग्यासाठी नुकसानकारक समजली जात आहे. तज्ञांच्या मते, सर्व लोकांनी शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपायांचा वापर करत राहिले पाहिजे. पण सर्वप्रथम हे जाणून घेणे महत्वाचे आहे की तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली आहे का? जर होय, ते कसे ओळखावे? सविस्तर जाणून घेऊया.

हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं कॉलेस्ट्रॉल वाढणं

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका, कार्डियाक अरेस्ट आणि स्ट्रोक सारख्या अनेक जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात ज्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढते.

तज्ञांच्या मते, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपायांचा वापर करून, हृदयरोगाच्या जोखमीपासून कोणीही सुरक्षित राहू शकतो. यासाठी प्रथम आपल्याला वाढलेल्या कोलेस्टेरॉलच्या लक्षणांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा वाढलेले कोलेस्टेरॉलची समस्या हात, नाक आणि गुडघ्यांच्या बदलांच्या आधारे शोधली जाऊ शकते.

हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं काय आहेत?

आरोग्य तज्ञांच्या मते, सहसा उच्च कोलेस्टेरॉलची कोणतीही लक्षणे नसतात. जेव्हा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची समस्या असते तेव्हाच हे ओळखले जाते. जर तुमच्या कुटुंबातील कोणाला उच्च कोलेस्टेरॉलची समस्या आली असेल तर तुम्हीही सावधगिरी बाळगली पाहिजे. या व्यतिरिक्त, उच्च कोलेस्टेरॉलची समस्या इतर अनेक परिस्थितींमध्ये देखील उद्भवू शकते, ज्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

1) उच्च रक्तदाबाची समस्या असलेले लोक.

2) ज्या लोकांचे वजन जास्त आहे.

3) जे लोक खूप धूम्रपान करतात.

त्वचेत होऊ शकतात असे बदल

आरोग्य तज्ञांच्या मते, जर उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वेळेवर नियंत्रित केली गेली नाही, तर ती धमन्यांमध्ये अडथळा आणू शकते. ज्यामुळे सर्व हृदयरोगाचा धोका वाढतो. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या मते, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी त्वचेवर काही बदल दर्शवते ज्याच्या आधारावर ते ओळखता येऊ शकते.

ज्या लोकांना उच्च कोलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांच्या कोपर, गुडघे, हात आणि पायांवर लहान पिवळे किंवा लाल डाग असू शकतात. अनेकदा हे दाणे पाहणारे लोक गोंधळून जाऊ शकतात. कालांतराने हे लहान डाग थोड्या मोठ्या गुठळ्याचे स्वरूप देखील घेऊ शकतात, जे बहुतेक वेदनारहित असतात.

हाय कॉलेस्ट्रॉलपासून कसा कराल बचाव?

आरोग्य तज्ञांच्या मते, जर आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीत काही सुधारणा केली तर उच्च कोलेस्टेरॉलची समस्या टाळता येईल. यासाठी फिश नट्स, तूप, खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल यासारखा हेल्दी चरबीयुक्त आहार घ्या. सॅच्यूरेडेट फॅट्स आणि पॅकेज केलेले पदार्थ टाळा. नियमित व्यायाम करा आणि आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवा.

टॅग्स : हृदयरोगहेल्थ टिप्सआरोग्यहृदयविकाराचा झटका