Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मोबाइल गेम खेळून मुलांनाही येतोय पॅरालिसिसचा झटका-पाठीच्या कण्याचाही त्रास; आक्रस्ताळी होतात मुलं-तज्ज्ञांचा इशारा

मोबाइल गेम खेळून मुलांनाही येतोय पॅरालिसिसचा झटका-पाठीच्या कण्याचाही त्रास; आक्रस्ताळी होतात मुलं-तज्ज्ञांचा इशारा

Mobile gaming health risks in children: Paralysis from excessive mobile use: सतत गेम खेळल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर होतोय परिणाम, मानसिक ताणासह पॅरालिसिसचा झटका येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 15:46 IST2025-05-09T15:45:32+5:302025-05-09T15:46:25+5:30

Mobile gaming health risks in children: Paralysis from excessive mobile use: सतत गेम खेळल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर होतोय परिणाम, मानसिक ताणासह पॅरालिसिसचा झटका येण्याची शक्यता

Children are also suffering from paralysis and spinal cord problems after playing mobile games becoming more vulnerable experts warn | मोबाइल गेम खेळून मुलांनाही येतोय पॅरालिसिसचा झटका-पाठीच्या कण्याचाही त्रास; आक्रस्ताळी होतात मुलं-तज्ज्ञांचा इशारा

मोबाइल गेम खेळून मुलांनाही येतोय पॅरालिसिसचा झटका-पाठीच्या कण्याचाही त्रास; आक्रस्ताळी होतात मुलं-तज्ज्ञांचा इशारा

मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे ते दिवसभर बाहेर खेळत असतात परंतु, ९० टक्के मुले मोबाईल फोन आणि स्क्रीन टाइमच्या जाळ्यात अडकलेली पाहायला मिळत आहे.(Mobile gaming health risks in children) अशातच दिल्लीतील १९ वर्षीय मुलाला पबजी गेमिंगच्या व्यवसनामुळे पॅरालिसिस झाला.(Screen time guidelines for children) १२ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रिन टाइम आणि एकाच स्थितीत बसून राहिल्यामुळे त्याच्या पाठीच्या कण्यावर परिणाम झाला. ज्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागले. (Child posture problems from screen time)
पाठीच्या कण्यावर दाब आल्यामुळे त्याचे किडनीवरील नियंत्रण गमावले. त्याच्या स्पाइनल ट्युबरक्युलोसिसमुळे प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात पोहचल्यानंतर चालणे आणि लघवी करणे देखील त्याला कठीण झाले. (Paralysis from excessive mobile use)

भोपळा-सूर्यफुलाच्या बियांसह ‘या’ ६ बिया वाढवतात फर्टिलिटी-तारुण्य आणि चेहऱ्यावरचं तेज ओसरणारच नाही

इंडियन स्पाइनल इंज्युरीज सेंटर (ISIC) मधील डॉक्टरांना त्याच्या मणक्यात दुखापत आढळली. किफो-स्कोलियोसिस नावाची दुखापत आढळल्यामुळे त्याला वाकताना किंवा ताठ बसताना ताण जाणवू लागला. ही केस डॉक्टरांसाठी अधिक आव्हानात्मक होती. टीबीचा वाढणारा आजार आणि सतत गेम खेळण्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला. 

तज्ज्ञ म्हणतात वाढत्या गेमिंग झोनचा विळखा, स्क्रीन टाइममुळे शारीरिक समस्यांवर ताण येत आहे. स्क्रिनचा दीर्घकाळ वापर केल्याने आणि चुकीच्या स्थिती आणि हालचालींच्या अभावामुळे हाडांच्या आणि सांध्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचे प्रमाण सर्वाधिक किशोरवयीन मुलांमध्ये पाहायला मिळत आहे. 

सारखी चक्कर येते, चालताना धाप लागते? असू शकतात 'या ' गंभीर आजाराची लक्षणं, ५ गोष्टी तपासा

व्हिडीओ गेममुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतोय.यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य, चिडचिड आणि संवाद कमी होताना दिसून येत आहे. तसेच खाण्यापिण्यासह त्यांच्या झोपेच्या वेळापत्रकावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला. अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही त्यामुळे शैक्षणिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम. तसेच कमी वयात पॅरालिसिसचा झटका आणि पाठीच्या कण्याचा त्रास मुलांना जाणवू लागला. 

 

Web Title: Children are also suffering from paralysis and spinal cord problems after playing mobile games becoming more vulnerable experts warn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.