Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवण झाल्यावर लगेच खा 'या' काही नॅचरल गोष्टी, दातांच्या अनेक समस्या होतील दूर

जेवण झाल्यावर लगेच खा 'या' काही नॅचरल गोष्टी, दातांच्या अनेक समस्या होतील दूर

Teeth Whitening Home Remedies: आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलेले काही सोपे घरगुती उपाय तुमचे दात स्वच्छ ठेवतील आणि किड होण्यापासून वाचवतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:03 IST2025-11-05T11:56:51+5:302025-11-05T12:03:48+5:30

Teeth Whitening Home Remedies: आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलेले काही सोपे घरगुती उपाय तुमचे दात स्वच्छ ठेवतील आणि किड होण्यापासून वाचवतील.

Chew these things after meal to keep teeth clean and rid of cavity | जेवण झाल्यावर लगेच खा 'या' काही नॅचरल गोष्टी, दातांच्या अनेक समस्या होतील दूर

जेवण झाल्यावर लगेच खा 'या' काही नॅचरल गोष्टी, दातांच्या अनेक समस्या होतील दूर

Teeth Whitening Home Remedies: जास्त मीठ खाणं किंवा तोंडाची नीट स्वच्छता न ठेवणं, या दोन कारणांमुळे दातांच्या अनेक समस्या उद्भवतात. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या समस्या नंतर इतक्या वेदनादायक होतात की काही खाणं सुद्धा अवघड होतं. आणि जर दातात किड लागली, तर हळूहळू दात आतून पोकळ होऊ लागतात आणि असह्य वेदना होतात. अशा वेळी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलेले काही सोपे घरगुती उपाय तुमचे दात स्वच्छ ठेवतील आणि किड होण्यापासून वाचवतील.

जेवणानंतर काय खावं?

लवंग

लवंगमध्ये यूजेनॉल नावाचं खास तत्व असतं. ज्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे दातातील बॅक्टेरिया नष्ट करून किड थांबवतात. दातदुखी आणि हिरड्यांमधील वेदनेतही आराम देतात. अशात जेवणानंतर दातांमध्ये एक लवंग ठेवून हलकी चावावी. किंवा लवंग तेल वापरल्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि ताजेपणा टिकतो.

पेरूची पानं

पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण दातांना मजबूती देतात आणि हिरड्या निरोगी ठेवतात. पानांमध्ये क्वेरसेटिन नावाचं तत्व असतं, जे ओरल हेल्थ साठी अत्यंत फायदेशीर असतं. अशात रोज जेवणानंतर १–२ पेरूची ताजी पानं चावून खा. यामुळे दात स्वच्छ राहतात आणि किड होण्याची शक्यता कमी होते.

कडूलिंबाची काडी

कडूलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर प्रमाणात असतात. हे दातांतील बॅक्टेरिया नष्ट करून किड होण्यापासून वाचवतात. हिरड्या मजबूत करतात आणि दातांचा पिवळेपणा कमी करतात. जेवणानंतर कडूलिंबाच्या काडीने दात घासा. यामुळे दातांवरील थर निघतो आणि नैसर्गिक चमक परत येते.

Web Title : दांतों के लिए भोजन के बाद खाएं ये प्राकृतिक चीजें, समस्याएँ होंगी दूर।

Web Summary : लौंग, अमरूद के पत्ते और नीम की दातुन बैक्टीरिया से लड़ते हैं, मसूड़ों को मजबूत करते हैं और कैविटी को रोकते हैं। डॉ. सलीम जैदी द्वारा सुझाए गए ये घरेलू उपाय भोजन के बाद मौखिक स्वच्छता और स्वस्थ मुस्कान को बढ़ावा देते हैं।

Web Title : Eat these natural foods after meals for healthy, strong teeth.

Web Summary : Cloves, guava leaves, and neem sticks fight bacteria, strengthen gums, and prevent cavities. These simple home remedies, suggested by Dr. Salim Zaidi, promote oral hygiene and a healthy smile after every meal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.