Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पेरु तर खाताच आता पेरुची पानंही चघळा, आरोग्यासाठी पेरुच्या पानांचे फायदे मोजू तेवढे कमीच

पेरु तर खाताच आता पेरुची पानंही चघळा, आरोग्यासाठी पेरुच्या पानांचे फायदे मोजू तेवढे कमीच

chew guava leaves for better health , see the health benefits of guava leaves : पेरुची पाने म्हणजे आरोग्यासाठी औषध.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 16:38 IST2025-09-10T16:35:58+5:302025-09-10T16:38:06+5:30

chew guava leaves for better health , see the health benefits of guava leaves : पेरुची पाने म्हणजे आरोग्यासाठी औषध.

chew guava leaves for better health , see the health benefits of guava leaves | पेरु तर खाताच आता पेरुची पानंही चघळा, आरोग्यासाठी पेरुच्या पानांचे फायदे मोजू तेवढे कमीच

पेरु तर खाताच आता पेरुची पानंही चघळा, आरोग्यासाठी पेरुच्या पानांचे फायदे मोजू तेवढे कमीच

पेरु हे फळ फार आवडीने खाल्ले जाते. पेरु आरोग्यासाठी चांगला असतो. मात्र फक्त पेरुच नाही तर पेरुची पानेसुद्धा आरोग्यासाठी उपयुक्त असतात. पेरुच्या पानात औषधी गुणधर्म असतात. ( chew guava leaves for better health ,  see the health benefits of guava leaves)पेरुच्या पानांमध्ये टॅनिन्स, फ्लॅव्होनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व 'सी' आणि नैसर्गिक दाहशामक घटक असतात. जे शरीराच्या अनेक तक्रारींवर परिणामकारक ठरतात. पेरुची पाने स्वच्छ धुवायची आणि चघळायची. त्याचा रस गिळायचा आणि चोथा फेकून द्यायचा. हा रस अनेक त्रासांवर परिणाम कारक ठरतो. आरोग्यासाठी फार छान ठरतो.

१. पेरुची कोवळी पाने चघळल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि हिरड्यांची सूज कमी होते. त्यामुळेच दातदुखी, हिरड्यांतून रक्त येणे किंवा तोंडात वारंवार जंतुसंसर्ग होणे या समस्यांवर पेरुची पाने चघळणे हा सोपा उपाय मानला जातो. पेरुची पाने चघळल्याने त्यातील अँटी बॅक्टेरियल घटक तोंडातील जंतू नष्ट करतात आणि तोंडाला ताजेतवाने ठेवतात. तोंडाच्या आरोग्यासाठी पेरुची पाने उपयुक्त असतात.

२. पेरुच्या पानांचा रस पोटाशी संबंधित विकारांवरही खूप उपयोगी ठरतो. जुलाब झाल्यास या पानांचा रस पोटाला आराम देण्यासाठी फायद्याचा ठरतो. पोट शांत होते आणि पचन सुधारते. त्यात असलेले टॅनिन्स शरीराच्या आतील सूज कमी करतात व जंतूंची वाढ थांबवतात.

३. हा रस रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनाही तो फायद्याचा ठरु शकतो. पेरुच्या पानांतील दाहशामक गुणधर्मामुळे त्वचेवरील जखमा, लालसरपणा किंवा अॅलर्जी यावरही पानांचा लेप लावला जातो.

४. उष्णतेवर ही पाने फायद्याची ठरतात. अनेकांना सतत तोंडात फोड येतात. तोंड येण्याची समस्या या पानांच्या रसामुळे कमी होते. दिवसातून किमान तीन ते चार पाने चघळा. तोंड लवकर बरे होते. 

नियमित पेरूची पाने चघळल्याने पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स असल्याने ते पेशींचे नुकसान होऊ देत नाहीत. त्यामुळे पेरुचे फळ जितके पौष्टिक आहे तितकेच त्याची पानेही उपयुक्त ठरतात आणि घरच्या घरी सहज वापरुन अनेक छोट्या आरोग्य समस्या दूर करता येतात.

Web Title: chew guava leaves for better health , see the health benefits of guava leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.