Join us

छातीत चमक-जळजळ होते-दुखते-श्वास घेतानाही त्रास होतो? ‘ही’ चूक ठरतेय या त्रासाचं कारण, उपायही सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 15:19 IST

Chest pain and breathing trouble ? This is the cause of the problem, and the solution is simple : सारखे छातीत दुखत असेल तर ही कारणे असू शकतात. वेळीच उपाय करा.

हातापायाचे दुखणे असेल तर त्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. मात्र जर छातीत दुखत असेल तर माणसाला पटकन भीती वाटते. हृदय विकाराचे वाढते प्रमाण आहेच तेवढे धोक्याचे. (Chest pain and breathing trouble ? This is the cause of the problem, and the solution is simple.)छातीत अचानक दुखायला लागल्यावर माणूस घाबरुन जातो. अर्थात अशावेळी काळजी घेणे गरजेचेच असते. मात्र प्रत्येक वेळी फक्त मोठ्या कोणत्या कारणासाठी छातीत दुखत असेल असे नाही. काही वेळा साधी सामान्य कारणेही असतात त्यासाठी काही उपाय करता येतात. पाहा कशामुळे छातीत सतत जळजळ आणि वेदना होऊ शकतात.  

१. छातीत होणारी जळजळ प्रामुख्याने पचनसंस्थेशी संबंधित असते. अनेकदा गॅसमुळे पोट डब्ब होते. पोट फुगल्यावर नंतर हळूहळू छातीत दुखायला लागते. कारण पोटातील गॅस वरच्या दिशेला सरकून हृदयावर दाब निर्माण करतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि पटकन भीती वाटते. अशावेळी गॅस पास व्हावेत यासाठी उपाय करा. जिऱ्याचे पाणी, ओवा असे उपाय करुन पाहा. विशेषतः आम्लपित्त किंवा गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज (GERD) मुळे छातीत दुखते. यात पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येते आणि त्यामुळे छातीच्या मध्यभागी किंवा घशापर्यंत जळजळ जाणवते. 

२. चुकीच्या आहारामुळे छातीत वेदना होतात. जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न, तंबाखू किंवा मद्यपान, जास्त प्रमाणात कॅफीन आणि जेवणानंतर लगेच आडवे होणे या सवयींमुळे हा त्रास वाढतो. सोपे गणित असे आहे की पोटाला जास्त त्रास जाणवला की तो छातीपर्यंत पोहचतो. ताणतणाव, मानसिक त्रास, एग्झायटी, झोपेचा अभाव तसेच अतिप्रमाणात झोपणे आणि लठ्ठपणा देखील आम्लपित्ताची पातळी वाढवतात. 

हा त्रास टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. आहार हलका, संतुलित आणि वेळेवर घेणे गरजेचे आहे. जास्त मसाले, तळलेले पदार्थ आणि गॅस निर्माण करणारे अन्न कमी करावे. (Chest pain and breathing trouble ? This is the cause of the problem, and the solution is simple.)जेवणानंतर किमान दोन ते तीन तास आडवे न होणे, रात्री झोपताना डोके थोडे उंच ठेवून झोपणे, तसेच नियमित व्यायाम करणे या गोष्टी उपयुक्त ठरतात. ताण कमी ठेवण्यासाठी योग, ध्यान उपयुक्त ठरते. मात्र छातीत दुखताना दुखणे हाताकडे वळणे, घाम फुटणे किंवा इतरही त्रास व्हायला लागले तर अजिबात वेळ काढू नका. लगेच वैद्य गाठा. सतत कारणाशिवाय छातीत जळजळणे वेगळे आणि अशी लक्षणे असतील तर गंभीर आजाराचा इशारा असतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीसोशल व्हायरल