दिवसभराचा थकवा, कामाचा ताण आणि सतत डोक्यात चालणारे विचार यामुळे आजकाल अनेकजण रात्री अंथरुणावर पडूनही तासंतास डोळे ताणून बसलेले असतात. 'झोप येत नाही' ही समस्या आता कॉमन झाली असली तरी त्याचा आरोग्य आणि मूडवर गंभीर परिणाम होतो. आजकाल बदललेली लाईफस्टाईल, वाढलेला ताणतणाव, सतत मोबाईल-लॅपटॉपचा वापर आणि अनियमित झोपेच्या वेळा यामुळे अनेकांना रात्री नीट झोप येत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड, डोकेदुखी आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या सतावतात. रात्रीची झोप लागत नाही म्हणून आपण या समस्येवर अनेक उपाय करून पाहतो, या उपायांमध्ये काही घरगुती पारंपरिक उपाय देखील अतिशय फायदेशीर ठरतात(carom seeds & fennel tea for sleeping benefits weight loss).
रात्रीची शांत व गाढ झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वीच स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करून 'हर्बल टी' प्यायल्यास झोप न लागण्याची समस्या दूर होते. घरातीलच उपलब्ध पदार्थांपासून तयार केलेली हर्बल टी निद्रानाशावर (herbal tea to improve sleep quality) रामबाण उपाय मानली जाते. हा खास घरगुती हर्बल टी प्यायल्यास, शरीर आणि मन दोन्ही शांत करतो, तणाव कमी करतो आणि गाढ झोपेस मदत करतो. रात्री झोपण्यापूर्वी घेतलेला एक कप हर्बल टी तुमचे मन (carom seeds fennel tea at night for weight loss) शांत करून तुम्हाला गाढ व शांत झोप कशी मिळवून देतो ते पाहा...
शांत व गाढ झोपेसाठी खास 'हर्बल टी' करण्यासाठी लागणारे साहित्य...
१. ओवा - १ टेबलस्पून
२. बडीशेप - १/२ टेबलस्पून
३. पाणी - १/२ कप
४. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
५. मध - १/२ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे.
२. पाणी उकळल्यावर त्यात ओवा आणि बडीशेप घालावी.
३. मग ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर पाणी व्यवस्थित गरम करून घ्यावे.
४. हर्बल टी तयार झाल्यावर तो गाळून घ्यावा. यात आपण आपल्या आवडीनुसार लिंबाचा रस आणि मध मिसळून घ्यावा.
झोपण्यापूर्वी हर्बल टी पिण्यासाठी तयार आहे.
शुगर वाढण्याची भीती विसरा! रोज फक्त १ कप 'ब्लॅक कॉफी', मधुमेहावर रामबाण उपाय - रहाल कायम फिट...
हा हर्बल टी पिण्याचे फायदे...
१. ओव्यामध्ये नैसर्गिक रिलॅक्संट गुणधर्म असतात, जे शरीरातील स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करतात. तर बडीशेपचा सुगंध आणि त्यातील घटक मज्जासंस्थेला शांत करतात, ज्यामुळे मन स्थिर होऊन झोप येण्यास मदत होते.
२. अनेकदा रात्री पोट जड वाटणे, गॅस किंवा अपचनामुळे झोप लागत नाही. ओवा आणि बडीशेप या दोन्हीमुळे पचनक्रिया सुधारते. रात्री हा चहा प्यायल्याने पोट हलके वाटते आणि पोटाच्या तक्रारींमुळे होणारी झोप मोड टाळता येते.
पालकांच्या 'या' ५ चुकांमुळेच मुलं हट्टी होतात! ओरडणं - मारणं सोडा, वेळीच सुधारा नाहीतर...
३. बडीशेपमध्ये असे काही अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील 'मेलाटोनिन' (झोपेचे संप्रेरक) वाढवण्यास मदत करतात. ओव्यामुळे डोकेदुखी आणि मानसिक थकवा कमी होतो, ज्यामुळे आपल्याला लगेच झोप लागते.
४. जर सर्दी किंवा खोकल्यामुळे झोप येत नसेल, तर ओव्याचा चहा छातीतील कफ कमी करतो आणि श्वासोच्छ्वास सुरळीत करतो. यामुळे रात्री खोकल्याचा त्रास होत नाही आणि शांत झोप लागते.
५. हा हर्बल टी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो. शरीर जेव्हा आतून स्वच्छ आणि हलके असते, तेव्हा झोपेची गुणवत्ता आपोआप सुधारते.
