Join us

नजर धुसर झाल्याने दुरचं दिसेना? ५ व्यायाम- मुलांनाही करायला लावा, चष्म्याचा नंबर कमी होईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 12:39 IST

5 Eye Exercise For Better Vision: नजर तेज राहावी, चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी पुढे सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे...(how to strengthen eye vision naturally?)

ठळक मुद्दे स्वच्छ हवेत, मोकळ्या जागी आणि सुर्यप्रकाश येईल त्याठिकाणी बसून हे व्यायाम करा.

हल्ली प्रत्येकाचाच स्क्रिन टाईम खूप वाढला आहे. कामामुळे कित्येकांना तासनतास लॅपटॉप, डेस्कटॉपसमोर बसावं लागतं. कामाचे तास संपल्यानंतर मोबाईल, टीव्ही अशा स्क्रिन समोर असतातच. लहान मुलंही त्याला अपवाद नाहीत. अनेकांचे ऑनलाईन क्लास मोबाईल किंवा लॅपटॉपवर होतात. शिवाय मुलं टीव्हीसुद्धा खूप पाहतात. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो आहे आणि कमी वयातच मुलांना चष्मा लागतो आहे. एवढंच नाही तर मुलांमध्ये चष्म्याचा नंबरही खूप पटापट वाढत जातो. हे सगळं टाळायचं असेल तर मुलांकडून काही व्यायाम नियमितपणे करून घ्या. यामुळे त्यांचा चष्म्याचा नंबर वाढणार नाही (5 Eye Exercise For Better Vision). तसेच नजर सुधारण्यासही मदत होईल.(how to strengthen eye vision naturally?)

 

चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी व्यायाम

जेव्हा तुम्ही हे डोळ्यांचे व्यायाम कराल तेव्हा सगळ्यात पहिला नियम हा की स्वच्छ हवेत, मोकळ्या जागी आणि सुर्यप्रकाश येईल त्याठिकाणी बसून हे व्यायाम करा.

राजस्थानी पद्धतीचे 'मिरची के टिपोरे'! चाखून पाहा ही चटपटीत रेसिपी- लोणचं, चटणी विसरून जाल... 

१. पहिला व्यायाम म्हणजे डोळे घट्ट मिटा आणि त्यानंतर पुन्हा उघडा. अशी डोळ्यांची उघडझाप साधारण १० वेळा करा आणि असे ५ राऊंड करावे. 

२. डोळ्यांची उघडझाप करण्याचा व्यायाम झाल्यानंतर दोन्ही तळहात एकमेकांवर घासा आणि नंतर ते डोळ्यांवर ठेवा. हातांमध्ये निर्माण होणारी उब डोळ्यांसाठी अतिशय चांगली असते. असे ३ ते ४ वेळा करा.

 

३. यानंतर अगदी सावकाशपणे मान न हलवता डोळे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने गोलाकार फिरवा. असं साधारण दोन्ही बाजुंनी ५- ५ वेळा करा.

टेम्पल ज्वेलरी झुमक्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, असा ट्रेण्डी दागिना आपल्याकडे हवाच.. फक्त १०० रुपयांत मस्त खरेदी

४. यानंतर उजवा किंवा डावा हात समोर करा. हात खांद्याच्या रेषेत सरळ असू द्या. त्यानंतर हाताच्या अंगठ्याकडे नजर केंद्रित करा. अंगठा डावीकडे, उजवीकडे असा प्रत्येकी ५- ५ वेळा फिरवा आणि ते करत असताना अंगठ्याकडेच नजर केंद्रित करा.

५. यानंतर अंगठा वर आणि खाली असा प्रत्येकी ५- ५ वेळा करा. हे करतानाही अंगठ्याकडे नजर स्थिर ठेवा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Blurry vision? These 5 eye exercises can reduce your child's glasses number.

Web Summary : Increased screen time affects children's eyesight. Regular eye exercises, done in fresh air and sunlight, can help improve vision and potentially reduce dependence on glasses. These include blinking, palming, and eye rotations.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगाव्यायाम