जीवनसत्त्व बी (Vitamin B) हे प्रत्यक्षात एकच नसून बी-कॉम्प्लेक्स म्हणून ओळखले जाणारे अनेक जीवनसत्त्वांचा एक समूह आहे. यात B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 यांचा समावेश होतो. ही सर्व जीवनसत्त्वे शरीरातील ऊर्जा निर्मिती, मेंदू व मज्जासंस्थेचे कार्य, रक्तनिर्मिती आणि त्वचा-केसांचे आरोग्य यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. (Can't remember things? must check 'Vitamin B', the reason for the gloomy mood towards life...)त्यामुळे जीवनसत्त्व बी ची कमतरता झाली तर शरीरावर त्याचा थेट परिणाम दिसून येतो.
जीवनसत्त्व बी ची कमतरता असल्यास होणारे परिणाम
जीवनसत्त्व बी कमी झाले की शरीराची ऊर्जा पातळी घटते. सतत थकवा जाणवतो, काम करण्याची इच्छा राहत नाही आणि शरीर लवकर थकते. असे अनेक परिणाम दिसू शकतात. मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे चिडचिड, लक्ष न लागणे, विसरभोळेपणा किंवा नैराश्याची भावना वाढू शकते. काही वेळा हात-पाय बधिर होणे, मुंग्या येणे किंवा जळजळ होणे अशी लक्षणेही जाणवतात.
जीवनसत्त्व बी कमतरतेची लक्षणे
या कमतरतेची लक्षणे हळूहळू दिसू लागतात. ओठ फुटणे, जीभ लालसर होणे किंवा दाह होणे, तोंडात वारंवार पिंपल्स येणे ही सामान्य चिन्हे आहेत. त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, नखं ठिसूळ होणे असे बदलही दिसू शकतात. काही लोकांमध्ये भूक न लागणे, पचन बिघडणे, मळमळ किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे आढळतात. B12 ची कमतरता जास्त असल्यास रक्ताल्पता (अॅनिमिया) आणि चक्कर येणेही होऊ शकते.
जीवनसत्त्व बी ची कमतरता का उद्भवते
अयोग्य आहार, सतत फास्ट फूड किंवा जंक फूडचे सेवन, मद्यपान, दीर्घकाळ चालणारा ताण-तणाव आणि काही औषधांचा वापर ही प्रमुख कारणे आहेत. तसेच शाकाहारी लोकांमध्ये विशेषतः B12 ची कमतरता जास्त प्रमाणात आढळू शकते.
जीवनसत्त्व बी कमतरतेवर उपाय
संतुलित आणि पोषक आहार घेणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा नियमित आहारात समावेश केल्यास बी-कॉम्प्लेक्स मिळण्यास मदत होते. पुरेशी झोप घेणे, ताण कमी ठेवणे आणि मद्यपान टाळणे हेही आवश्यक आहे. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने बी-कॉम्प्लेक्स सप्लिमेंट्स घेता येतात, पण स्वतःहून औषधे घेणे टाळावे.
Web Summary : Vitamin B deficiency causes fatigue, neurological issues, and skin problems. Poor diet, stress, and certain medications can deplete B vitamins. A balanced diet, stress management, and supplements, as advised by a doctor, can help restore levels.
Web Summary : विटामिन बी की कमी से थकान, तंत्रिका संबंधी समस्याएं और त्वचा की समस्याएं होती हैं। खराब आहार, तनाव और कुछ दवाएं बी विटामिन को कम कर सकती हैं। संतुलित आहार, तनाव प्रबंधन और डॉक्टर की सलाह के अनुसार पूरक स्तर को बहाल करने में मदद कर सकते हैं।