Stomach Heart Connection : भरपूर लोक पोटात गॅस, जडपणा किंवा जळजळ होण्याच्या समस्येला फारच हलक्यात घेतात. नेहमीच या समस्या होत असल्याने त्यांकडे फार गंभीरतेने बघितलं जात नाही. पण मेडिकल सायन्स सांगतं की, काही स्थितींमध्ये पोटातील या समस्या हृदयासाठी घातक ठरू शकतात. खासकरून वृद्ध आणि आधी हृदयरोगाचे शिकार असलेल्या लोकांसाठी. अलिकडेच उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातून समोर आलेली घटना याच धोक्याकडे लक्ष वेधून घेत आहे. ज्यात गॅसची समस्या झाल्यावर हार्ट अॅटॅकचा धोका वर्तवला जात आहे.
काय आहे घटना?
बिजनौरच्या उमरी गावात एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की, व्यक्ती घरात एकटी होती आणि ती मृतावस्थेत आढळली. अशी माहिती समोर आली की, मृत्यू हार्ट अॅटॅकमुळे झाला. जेवण केल्यावर त्यांना गॅसची समस्या झाली आणि गॅसमुळे हार्ट अॅटॅक येऊन व्यक्तीचा मृ्त्यू झाला.
सुरूवातीच्या तपासणी आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये शरीरावर कोणतीही जखम किंवा संघर्ष केल्याची खूण दिसली नाही. शंका व्यक्त केली जात आहे की, पोटात जास्त गॅस झाल्यामुळे व्यक्तीला हार्ट अॅटॅक आला. भलेही प्रत्येकवेळी गॅसची समस्या हार्ट अॅटॅकचं कारण ठरत नाही, पण ही घटना हे दाखवून देते की, काही केसेसमध्ये गॅसला हलक्यात घेणं जीवावर बेतू शकतं.
गॅसने हार्ट अॅटॅकवर काय बोलले डॉक्टर
खरंच पोटात गॅस तयार झाल्याने हार्ट अॅटॅक येऊ शकतो का? यावर डॉ. अमित मिगलानी यांनी एका वेबसाइटला माहिती दिली की, सामान्यपणे असं शक्य नाही. गॅस आणि हार्ट अॅटॅकचं काही कनेक्शन नाही. हा हार्ट अॅटॅकच आहे ज्याचा संबंध गॅसशी जोडला जात आहे. बरेच लोक छातीत वेदना होण्याला गॅसची समस्या समजतात. डायबिटीसचे रूग्ण किंवा हृदयाच्या रूग्णांना नेहमीच छातीत वेदना होतात, तेव्हा ते या दुखण्याला गॅस समजतात. जर वेदना सतत होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
पोट आणि हृदयाचं कनेक्शन काय?
पोट आणि हृदय थेटफणे वागस नर्वसोबत जुळलेले असतात. जेव्हा पोटात जास्त गॅस, सूज किंवा दबाव तयार होतो, तेव्हा ही नर्व प्रभावित होऊ शकते. यामुळे हृदयाचे ठोके स्लो होतात किंवा असंतुलित होतात. ब्लड प्रेशरमध्ये बदल होतो. तर काही संवेदनशील लोकांमध्ये छातीत वेदना किंवा अस्वस्थतात जाणवते. वृद्ध किंवा हृदयरोग असलेल्यांमध्ये ही स्थिती जास्त बघायला मिळते.
कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?
गॅस किंवा जडपणासोबत छातीत वेदना
वेदना उजवा हात, जबडा आणि पाठीमध्ये पसरणं
घाम, अस्वस्थता, चक्कर येणे
उलटी किंवा मळमळ
आराम केल्यावरही वेदना कमी न होणे
कुणी घ्यावी काळजी?
५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी काळजी घ्यावी. तसेच हाय बीपी, डायबिटीस किंवा कोलेस्टेरॉलच्या रूग्णांनी सुद्धा काळजी घ्यावी. इतकंच नाही तर ज्यांना आधी हार्ट अॅटॅक येऊन गेला, त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असते. जे लोक रात्री उशीरा जेवतात त्यांनीही काळजी घ्यावी आणि ज्यांना नेहमीच गॅस - अॅसिडिटी होते त्यांनीही काळजी घ्यावी.
एकंदर काय तर प्रत्येक वेळी गॅसची समस्या हार्ट अॅटॅकचं कारण ठरत नाही. पण चुकीच्या वेळी गॅसकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या संकेतांना ओळखा आणि वेळीच डॉक्टरांना दाखवा.
