Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री गाढ झोपेतच हार्ट ॲटॅक येण्याची ३ कारणं! अनेक दिवस आधी दिसतात 'ही' लक्षणं...

रात्री गाढ झोपेतच हार्ट ॲटॅक येण्याची ३ कारणं! अनेक दिवस आधी दिसतात 'ही' लक्षणं...

can heart attack happen while sleeping : Can Heart Attack Occur While Sleeping : night time heart attack symptoms : causes of heart attack while sleeping : heart attack in sleep : how to prevent heart attack during sleep : symptoms of silent heart attack at night : डॉक्टर सांगतात, रात्रीच्या वेळी झोपतेच हार्ट ॲटॅक येण्याची मुख्य ३ कारणे नेमकी कोणती, ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2025 17:27 IST2025-08-02T17:15:18+5:302025-08-02T17:27:02+5:30

can heart attack happen while sleeping : Can Heart Attack Occur While Sleeping : night time heart attack symptoms : causes of heart attack while sleeping : heart attack in sleep : how to prevent heart attack during sleep : symptoms of silent heart attack at night : डॉक्टर सांगतात, रात्रीच्या वेळी झोपतेच हार्ट ॲटॅक येण्याची मुख्य ३ कारणे नेमकी कोणती, ते पाहा...

can heart attack happen while sleeping Can Heart Attack Occur While Sleeping night time heart attack symptoms how to prevent heart attack during sleep symptoms of silent heart attack at night | रात्री गाढ झोपेतच हार्ट ॲटॅक येण्याची ३ कारणं! अनेक दिवस आधी दिसतात 'ही' लक्षणं...

रात्री गाढ झोपेतच हार्ट ॲटॅक येण्याची ३ कारणं! अनेक दिवस आधी दिसतात 'ही' लक्षणं...

सध्याच्या काळात हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाणं बरंचं वाढलं आहे. आजकाल अशी परिस्थितीत आहे की, हार्ट ॲटॅक कधीही, कुठेही आणि कुणालाही येऊ शकतो. चालता-बोलता, खाताना-पिताना हार्ट ॲटॅक येऊन अचानक मृत्यू होणं हे आजकाल फारच कॉमन झालं आहे. अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला ( Can Heart Attack Occur While Sleeping) किंवा वेगवेगळ्या सोशल मिडिया माध्यमांवर अचानकपणे हार्ट ॲटॅक येऊन (heart attack in sleep) मृत्युमुखी पडलेल्यांचे व्हिडिओ पाहतो. आपण अनेकदा ऐकतो की काही लोकांना झोपेतच हार्ट अटॅक येतो, आणि त्यांचं अचानक निधन होतं. ही गोष्ट धक्कादायक वाटली तरी बऱ्याचअंशी खरी आहे. बहुतेकजणांना रात्रीच्या गाढ झोपेतच हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे(how to prevent heart attack during sleep).

हार्ट ॲटॅक फक्त दिवसाच नव्हे, तर झोपेतही येऊ शकतो, आणि त्याचा परिणाम अनेकदा जीवघेणा ठरतो. झोपेतच हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन मृत्यू होण्याचा अनुभव (symptoms of silent heart attack at night) ऐकल्यावर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. फरीदाबाद मधील एशियन हॉस्पिटलच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रतीक चौधरी यांनी हरजिंदगीला दिलेल्या मुलाखतीत, रात्रीच्या वेळी झोपतेच हार्ट ॲटॅक येण्याची मुख्य ३ कारणे नेमकी कोणती?रात्री शांत झोपेत असताना शरीरात असे काय बदल होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो? झोपेच्या वेळी हृदयावर ताण का येतो आणि ही स्थिती टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. 

१. झोपेत हार्ट ॲटॅक येऊ शकतो का?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, झोपेत हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता काही विशिष्ट व्यक्तींमध्ये अधिक असते. विशेषतः ज्या व्यक्ती खूप लठ्ठ आहेत किंवा स्लीप अ‍ॅप्निया (झोपेदरम्यान श्वास घेण्यातील अडथळा) या दोन समस्या असणाऱ्या व्यक्तींना झोपेत हार्ट ॲटॅक येण्याचा धोका अधिक असतो. सामान्यपणे झोपेत असताना हृदयाची गती मंदावते, हार्ट रेट आणि आरपीपी (Rate Pressure Product) कमी राहतात, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो. पण काही व्यक्तींमध्ये विशेषतः जास्त वजन असलेल्या किंवा स्लीप अ‍ॅप्नियाग्रस्त लोकांमध्ये, झोपेत ऑक्सिजनची पातळी कमी होते. यामुळे शरीरात एकदम हार्ट रेट आणि बीपी वाढू शकतो, आणि तेच रात्रीच्या वेळी झोपेत हार्ट ॲटॅक येण्याचं कारणं ठरतं. यासाठीच, रात्री झोपताना जर श्वास घेताना अडचण येत असेल, जोरात घोरत असाल किंवा झोपेतून दचकून उठणं वारंवार होत असेल, तर हे लक्षण दुर्लक्षित न करता ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.

उपवास सोडताना कोणता पदार्थ आधी खावा? तज्ज्ञ सांगतात, उपवासानंतरही मिळेल भरपूर एनर्जी...

२. रात्रीच्या वेळी झोपेत असताना हार्ट ॲटॅकचा धोका अधिक जास्त का असतो ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, रात्रीच्या वेळी किंवा सकाळच्या साखर झोपेत अर्धनिद्रा अवस्थेत हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण अधिक जास्त असते. यामागील प्रमुख कारण म्हणजे कैटेकोलामाइन्स आणि कॉर्टिसोल हे हार्मोन्स या वेळेत शरीरात जास्त प्रमाणात स्रवतात, ज्यामुळे शरीराचा तणाव वाढतो. याचबरोबरइतरही ३ मुख्य कारणं देखील आहेत. ब्लड प्लेटलेट्स अधिक जास्त प्रमाणांत चिकट होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे रक्तात गाठी (क्लॉट्स) तयार होऊ शकतात. सोबतच, रक्तवाहिन्या आकुंचित होतात त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याचा धोका वाढतो, आणि परिणामी हार्ट अटॅक येऊ शकतो.    

शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या हार्मोनल बॅलन्सवर काय परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...

३. हार्ट ॲटॅकची मुख्य लक्षणं... 

१. छातीत दुखणं किंवा जडपणा जाणवणं. 

२. झोपेतून अचानक घाबरून जाग येणं. 

३. प्रचंड घाम येणे. 

४. उलटीचा त्रास किंवा मळमळ होणं. 

५. बेचैन वाटणं. 

६. जबड्यांत, मानेला किंवा डाव्या हाताला वेदना होणं. 

जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला अशा प्रकारची लक्षणं जाणवत असतील, तर कधीही दुर्लक्ष करू नका. लगेच जवळच्या रुग्णालयात जा किंवा कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेत उपचार घेतल्यास जीव वाचवता येतो.

Web Title: can heart attack happen while sleeping Can Heart Attack Occur While Sleeping night time heart attack symptoms how to prevent heart attack during sleep symptoms of silent heart attack at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.