Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पाणी वाढवतेय तुमची शुगर, ‘या’ लोकांनी चुकीच्या वेळी पाणी प्यायले तर ब्लड शुगर वाढण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2026 14:28 IST

blood sugar increase reasons: water and blood sugar levels: diabetes and water intake : पाणी पिण्याच्या वेळेचा आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.

मानवी शरीराचं सुमारे ६० ते ७० टक्के वजन पाण्याचं बनलेलं असतं. त्यामुळे पाणी हे फक्त तहान भागवण्यासाठी नाही. तर शरीर नीट चालण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे.(blood sugar increase reasons) श्वास घेणं, अन्न पचवणं, रक्ताभिसरण, पेशींचं संरक्षण, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं. या सगळ्या क्रिया योग्य प्रकारे व्हाव्यात यासाठी पुरेसं पाणी पिणं फार गरजेचं आहे.(water and blood sugar levels) पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करतं. आपण खातो-पितो त्या अन्नातून तयार होणारे टॉक्सिन्स घाम, लघवी आणि मलावाटे बाहेर जाण्यास मदत होते.(diabetes and water intake) पुरेसं पाणी न प्यायल्यास किडनीवर ताण येतो आणि लघवीशी संबंधित त्रास, जळजळ किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण काही लोकांना पाणी जपून पिणं गरेजचं आहे. हे ऐकायला थोड विचित्र वाटेल पण पाणी पिण्याच्या वेळेचा आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. 

मकर संक्रांत स्पेशल: चिमुकलीसाठी घ्या काळ्या रंगाचा खणाचा फ्रॉक - १५० रुपयांत मिळणारे ५ ट्रेंडिंग पॅटर्न, दिसेल बाहुलीसारखी

खरंतर पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहे. पण पाणी पिण्याच्या वेळेचा रक्तातील साखरेवरही परिणाम होतो. मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारातील इतर गोष्टींप्रमाणेच पाणी पिताना काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया नेमका आरोग्यावर कसा परिणाम होतो. 

कमी पाणी पिण्याचे परिणाम

मधुमेहींनी त्यांच्या पाणी पिण्याकडे लक्ष द्यायला हवं. शरीरात पाण्याची कमतरता असल्याने ग्लुकोजचे प्रमाण वाढतं. जेव्हा आपण पुरेसे पाणी पित नाही तेव्हा रक्त जाड होते. पुरेसे पाणी न प्यायल्यास ग्लुकोज मीटरवर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतं. 

खूप कमी पाणी प्यायल्याने इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण होते. डिहायड्रेशनमुळे कॉर्टिसोलसारख्या तणाव संप्रेरकांचे प्रमाण देखील वाढते. आणि जास्त कॉर्टिसोलमुळे पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देतात. यामुळे कितीही चांगला आहार घेतला तरी आरोग्यावर परिणाम होतो. 

खूप कमी पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. चुकीच्या वेळी पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. जास्त कार्बोहायड्रेटयुक्त जेवणानंतर जास्त पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल कमी होते. आणि पचन मंदावते. 

पाणी पिण्याची योग्य पद्धत 

  • दिवसभर थोडे थोडे करुन पाणी प्या. 
  • जेवणापूर्वी एक ते दोन ग्लास पाणी प्या. जेवणानंतर पाणी पिऊ नका. 
  • पाणी कोमट किंवा खोलीच्या तापमानावर असायला हवे. 
  • जेवाणानंतर ३० ते ४० मिनिटे जास्त पाणी पिऊ नका. 
English
हिंदी सारांश
Web Title : Drinking water at wrong times can increase blood sugar levels.

Web Summary : Water is vital, but timing matters, especially for diabetics. Insufficient water thickens blood, raising glucose. Avoid excess water after carb-rich meals to prevent slowed digestion. Sip water throughout the day, especially before meals, maintaining room temperature. Wait 30-40 minutes after eating before drinking more.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स