Join us

कॉटन बड- इअर ड्रॉपने कान स्वच्छ करताय? या चुका टाळा, व्हाल बहिरे- तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2025 12:58 IST

Cotton buds harmful for ears: Dangers of ear drops: How not to clean ears: आंघोळ करताना किंवा केस धुताना कानाच्या पाणी किंवा साबणाचा फेस जमा होतो. पाणी गेल्यामुळे आपल्याला नीटसे ऐकू येत नाही.

ठळक मुद्दे ओपीडीत ७० टक्के रुग्ण कानाच्या आजाराचे असतात. त्यामध्ये कानात बड घालून संसर्ग झालेले काही रुग्ण असतात. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी तर कानात बड घालू नये. त्यामुळे त्यांना कानात जखम होऊन मोठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

डॉ. शशांक म्हशाळ- सहयोगी प्राध्यापक, कूपर रुग्णालय 

शरीरातील असे अनेक भाग आहेत जे नाजूक आहेत त्यातील एक कान.(Cotton buds harmful for ears) कानाला हलकी जरी दुखापत झाली तरी आपल्याला सुचेनासे होते.(Dangers of ear drops) हल्ली जीवनशैलीनुसार प्रत्येकजण इअरफोन किंवा हेडफोन वापरतात. ज्यामुळे अनेकदा कानातून घाण बाहेर पडत नाही. (How not to clean ears) आंघोळ करताना किंवा केस धुताना कानाच्या पाणी किंवा साबणाचा फेस जमा होतो.(Ear cleaning mistakes) पाणी गेल्यामुळे आपल्याला नीटसे ऐकू येत नाही.(Why you should not use cotton buds) कानात इतका मळ साचतो की, यामुळे बरेचदा आपला कान दुखू लागतो. अशावेळी आपण बड किंवा ड्रॉपचा वापरुन कान साफ करतात. परंतु, यापद्धतीने कान साफ करणे धोक्याचे ठरु शकते.(Safe ways to clean ears) कान स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक क्रियेची निवड करायला हवी. असे मत कान, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. शशांक म्हशाळ यांनी मांडली आहे. 

World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

1. कान स्वच्छ कसा कराल? 

कान स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करताना हलक्या हाताने मऊ कापडाने स्वच्छ करा. तसेच कानात टोकेरी किंवा कॉटन बड घालू नका. यामुळे कानाला हानी पोहोचू शकते. 

2. कानातील केस, चिकट द्रवमुळे होते रक्षण 

कानाच्या आतील भागात असणारे केस आणि आतील भागात असणारे चिकट द्रव हे कानाच्या संरक्षणाची भूमिका बजावतात. त्यामुळे कानात धुळीचे कण जमा होत नाही. 

हनुवटीखालची- गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहऱ्याचा आकार बिघडलाय? ५ सोप्या गोष्टी करा- १५ दिवसांत दिसेल फरक

4. बड नकोच 

डॉक्टर सांगतात कानात बडचा वापर करु नका. परंतु, तरीदेखील अनेकजण त्याचा वापर करतात. यामुळे अनेकदा बड कानात किती खोलवर गेले आहे याचा अंदाज येत नाही. यामुळे कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे कानाला संसर्ग देखील होऊ शकतो. त्यासाठी बड न वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

5. लहान मुलांची घ्या काळजी 

लहान मुलांना अनेकदा सर्दी होते. ज्यामुळे नाकातील सर्दी कानात जाऊन कानातून पाणी वाहू लागते. अशावेळी कोणतेही तेल कानात टाकू नका. त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

डॉक्टर म्हणतात, ओपीडीत ७० टक्के रुग्ण कानाच्या आजाराचे असतात. त्यामध्ये कानात बड घालून संसर्ग झालेले काही रुग्ण असतात. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी तर कानात बड घालू नये. त्यामुळे त्यांना कानात जखम होऊन मोठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स