Join us

ब्रिटिश बॉक्सर जॉर्जिया ओकॉनरची कॅन्सरशी झुंज अपयशी! डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आणि गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2025 12:10 IST

Georgia O’Connor cancer: Georgia O’Connor death: Cancer symptoms in young adults: जॉर्जियाला अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा कॅन्सर झाला होता.

अवघ्या पंचवीसाव्या वर्षात ब्रिटिश बॉक्सर जॉर्जिया ओकॉनरची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.(Georgia O’Connor cancer) २२ मे रोजी तिचे निधन झाले. तिच्या खेळामुळे आणि बॉक्सिंग रेकॉर्डमुळे ती ओळखली जायची.(Georgia O’Connor death) तिच्या घरच्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जॉर्जियाचा जीव गेला असा आरोप केलाय. (Ulcerative colitis cancer) जॉर्जियाला अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा कॅन्सर झाला होता.(Ulcerative colitis causes and symptoms) तिने याबद्दल वारंवार डॉक्टरांशी चर्चा देखील केली होती. परंतु चुकीचे निदान आणि उपचार विलंब झाल्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले. इतकेच नाही तर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्यसेवेच्या व्यवस्थेबद्दलही मत मांडले होते. त्यावर हॉस्पिटलने हे सगळं खोट आहे असं सांगून तिचा आरोप फेटाळला. (British boxer Georgia O’Connor dies at 25)

भीती वाटते, आपलं कसं होणार भविष्यात? निर्णयच घेता येत नाही? वाचा मन शांत करणारे ४ उपाय

जॉर्जियाला कोलायटिस आणि पीएससी सारखे दोन गंभीर आजार जडले होते. याची माहिती तिने सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना दिली होती. तिने म्हटलं की, मी वेदनेने रडत होते. स्कॅन आणि रक्त तपासणीसाठी डॉक्टरांना वारंवार विनंती केली परंतु, कुणीही मला मदत केली नाही. वेळेवर मदत न मिळाल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. परंतु, अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार कसा होतो. याची कारणे आणि लक्षणे कोणती पाहूया. 

अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे आतड्यांचा कॅन्सर. यामध्ये आपली पचनसंस्था सगळ्यात जास्त जबाबदार असते. आपल्या संपूर्ण पचनसंस्थेसाठी आतड्याचे आरोग्य सुरळीत असणे महत्त्वाचे असते. यामध्ये आतड्यांना सूज येते, ओटीपोटीत दुखणे किंवा स्टूलमधून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच रक्तासह जुलाब, गुदद्वारात दुखणे, वारंवार शौचास जाणे, अचानक वजन कमी होणे, थकवा-ताप ही लक्षणे दिसू लागतात. वेळीच जर यावर उपचार केला नाही तर आपल्याला जीव गमावावा लागतो. 

असेच काहीसे जॉर्जियासोबत झाले. ९ मे ला तिचे लग्न झाले होते आणि त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली, लग्नानंतर अवघ्या दोनच आठवड्यांनी तिचा मृत्यू झाला.   

टॅग्स : आरोग्यकर्करोगहेल्थ टिप्स