Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > २ मिनिटांत ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे, साधे वाटणारे दुखणे असते गंभीर - वेळीच घ्या काळजी

२ मिनिटांत ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे, साधे वाटणारे दुखणे असते गंभीर - वेळीच घ्या काळजी

signs of breast cancer in women : how to detect breast cancer at home: breast cancer prevention at home: ब्रेस्ट कॅन्सर कसा ओळखावा याविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 11:41 IST2025-06-17T11:40:35+5:302025-06-17T11:41:17+5:30

signs of breast cancer in women : how to detect breast cancer at home: breast cancer prevention at home: ब्रेस्ट कॅन्सर कसा ओळखावा याविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

breast cancer early symptoms minor breast pain serious how to detect breast cancer at Home 2-minute breast cancer check | २ मिनिटांत ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे, साधे वाटणारे दुखणे असते गंभीर - वेळीच घ्या काळजी

२ मिनिटांत ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे, साधे वाटणारे दुखणे असते गंभीर - वेळीच घ्या काळजी

स्तनाच्या कर्करोगामध्ये हल्ली मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.(Breast Cancer Symptoms) या आजाराचे जितक्या लवकर निदान होईल, तितका हा रोग बरे करण्यास शक्य होते.(signs of breast cancer in women ) स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ही ठळकपणे दिसून येत नाही.( how to detect breast cancer at home) स्तनामध्ये लहानशी गाठ जरी तयार झाली असेल तरी देखील आपल्याला कळत नाही. (breast cancer prevention at home) 
WHO च्या मते या आजाराचे निदान सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे.(breast cancer awareness tips) येत्या काळात हा आजार आणखी किती भयानक होईल हे येणाऱ्या काळत कळेल.(2-minute breast cancer check) अशा परिस्थितीत महिलांनी जागरुक राहणे आणि वेळीच लक्षणे ओळखणे गरजेचे आहे.(women's health breast pain alert) डॉ. आकांक्षा श्रीवास्तव यांनी त्यांच्या इंस्टा पेजवरुन ब्रेस्ट कॅन्सर कसा ओळखावा याविषयी माहिती दिली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल. 

स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात की, यासाठी महिलांनी महिन्यातून एकदा नियमितपणे स्तानांची तपासणी करावी. जर आपले वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर मासिक पाळी संपल्यानंतर दर महिन्याला आपण स्वत: स्तानाची तपासणी करु शकतो. मासिक पाळीनंतर ही प्रक्रिया करणे सोपे असते. कारण त्यावेळी स्तानाच्या ऊती मऊ असतात. ज्या त्यावेळी चांगल्या राहतात. 

पावसाळ्यात घरात कुबट-दमट वास येतो? ५ उपाय- घरात वाटेल प्रसन्न रोज

स्तनाची चाचणी कशी कराल? 

1. स्तनाची तपासणी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आरशासमोर उभे राहवे लागले. स्तानांच्या आकाराकडे लक्ष द्या. कोणताही भाग दाबलेला किंवा बुडालेला दिसतोय का?, त्वचेवर काही आकुंचन किंवा ताण आहे का हे तपासा. कुठेही काही रेषा किंवा त्वचेचा पोत बिघडला आहे का हे देखील पहा. 

2. पॅल्पेशन चेक करण्यासाठी आपल्याला बोटांच्या मदतीने गोलाकार हालचालीत स्तन दाबून तपासणी करावी लागेल. स्तनांच्या खालपासून वरपर्यंत तपासणी सुरु करा. उजव्या किंवा डाव्या स्तनापासून सुरुवात करा. त्या ठिकाणी गाठ जाणवते का हे पाहा. स्तनांची तपासणी केल्यानंतर दोन्ही काखेची तपासणी करणे देखील महत्त्वाचे आहे. कारण गाठ आणि सूज या ठिकाणी देखील असू शकते. 


3. आंघोळ करताना स्तनांची तपासणी करणे चांगले असते. शरीर ओले असल्यामुळे त्वचा अधिक मऊ पडते. ज्यामुळे गाठ आहे की नाही हे समजण्यास सोपे जाते. हे नसेल जमत तर हाताला तेल किंवा लोशन लावून चाचणी करा. याप्रकारे आपण स्तनांची चाचणी करु शकतो. वरीलपैकी कोणतेही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचे मत जाणून घ्या. 

 

Web Title: breast cancer early symptoms minor breast pain serious how to detect breast cancer at Home 2-minute breast cancer check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.