Join us
Daily Top 2 Weekly Top 5

चुकीचे डाएट पडते महागात - हाडे होतील ठिसूळ , महिलांमध्ये या २ कमतरतांचे प्रमाण वाढते आहे, कारण ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2026 14:52 IST

Bones will become brittle, the prevalence of these 2 deficiencies is increasing in women, because : हाडे ठिसूळ होतात, जर या कमतरता उद्भवल्या.

बदलत्या जीवनशैलीचा महिलांच्या नक्कीच परिणाम होत आहे. कामाचा ताण, अनियमित आहार, झोपेचा अभाव आणि स्वतःकडे दुर्लक्ष या सगळ्यांचा थेट परिणाम शरीरातील पोषणमूल्यांवर होतो. (Bones will become brittle, the prevalence of these 2 deficiencies is increasing in women, because ....)त्यामुळे महिलांमध्ये काही विशिष्ट व्हिटॅमिन्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यात सर्वात जास्त दिसून येणाऱ्या दोन कमतरता म्हणजे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी१२.

व्हिटॅमिन डी ही महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारी कमतरता मानली जाते. हे व्हिटॅमिन हाडे मजबूत ठेवण्यासाठी, स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी आवश्यक असते. शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यास सतत थकवा जाणवणे, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, अंग दुखणे, केस गळणे आणि मूड सतत बदलणे अशी लक्षणे दिसू शकतात. दिवसभर घरात किंवा ऑफिसमध्ये बंद जागेत राहणे, उन्हात जाणे टाळणे, सनस्क्रीनचा अति वापर आणि पोषणमूल्ययुक्त आहाराचा अभाव या सवयींमुळे ही कमतरता वाढते.

ही कमतरता टाळण्यासाठी दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान १५ ते २० मिनिटे जाणे आवश्यक आहे. आहारात दूध, दही, चीज, तूप, बटर, आदी यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. चालणे, हलका व्यायाम आणि योगासने यामुळेही हाडांचे आरोग्य सुधारते.

दुसरी महत्त्वाची आणि तितकीच दुर्लक्षित कमतरता म्हणजे व्हिटॅमिन B12. हे व्हिटॅमिन मेंदूचे कार्य, मज्जासंस्थेचे आरोग्य आणि लाल रक्तपेशींची निर्मिती यासाठी अत्यंत गरजेचे आहे. महिलांमध्ये व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास सतत अशक्तपणा, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, हात-पाय बधीर होणे, एकाग्रतेचा अभाव आणि कधी कधी नैराश्याची भावना देखील निर्माण होऊ शकते. याचा परिणाम फक्त शारीरिक नाही तर मानसिकही असतो. त्यामुळे काळजी घेणे फार गरजेचे आहे. 

व्हिटॅमिन B12ची कमतरता प्रामुख्याने अयोग्य आहारामुळे दिसून येते. विशेषतः महिलांमध्ये ही समस्या जास्त आढळते. जंक फूड जास्त खाणे, वेळेवर जेवण न करणे आणि सतत डाएटिंग करणे या सवयी टाळायला हव्यात. आहारात दूध, दही, ताक, पनीर, आणि गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधे घेतल्यास ही कमतरता भरून काढता येते. डायटींगच्या नावाखाली उपाशी राहणे जास्त त्रासदायक ठरते. त्यामुळे आहार व्यवस्थितच घ्यायला हवा.  

एकूणच, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 या दोन कमतरता महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि त्यांचा थेट परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. योग्य सवयी लावून घेतल्या, संतुलित आहार घेतला आणि स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष दिले, तर या दोन्ही कमतरता सहज टाळता येऊ शकतात. महिलांनी इतरांसोबतच स्वतःच्या आरोग्यालाही तितकेच प्राधान्य देणे गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wrong Diet Costs Dearly: Brittle Bones, Deficiencies in Women Increase

Web Summary : Poor diet leads to vitamin D and B12 deficiencies in women, causing brittle bones, fatigue, and mood swings. Sunlight, balanced meals, and supplements are crucial for prevention and overall well-being. Prioritize your health.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्नसोशल व्हायरल