ओटीपोट फुगणे ही अनेक महिलांना त्रास देणारी समस्या आहे. सामान्यच गोष्ट आहे, काही आजार किंवा मोठी समस्या नाही. पोट फुगणे हा प्रकार मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी तसेच पाळीदरम्यान होतो. (bloating problems, stomach healthcare tips, Is your abdomen gassy? does it feel like your stomach is constantly bloated? 4 serious reasons)पण अनेकदा काहीही खास कारण नसताना आणि पाळी नसतानाही ओटीपोट फुगते. त्याची कारणे फक्त स्त्रीसंबंधित नसतात. पचनसंस्था, हार्मोन्स, जीवनशैली व मानसिक आरोग्य यांसारख्या घटकांचाही सहभाग असतो.
सर्वप्रथम, पचनसंस्थेतील समस्यांमुळे ओटीपोट फुगण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. महिलाच नाही तर पुरुषांनाही हा त्रास होतो. अन्न नीट न पचणे, गॅस निर्माण होणे, बद्धकोष्ठता, अपचन किंवा आंबट ढेकरा येणे यामुळे पोट फुगल्यसारखे जाणवते. काही महिलांना विशिष्ट खाद्यपदार्थ जसे की दूध, मैदा, फरसाण किंवा जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्यावर असा त्रास होतो. असे पदार्थ खाणे टाळणे गरजेचे आहे.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल बदल. मासिक पाळी नियमित असली तरीही हार्मोनल त्रास उद्भवतात. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोनच्या पातळीत बदल होतो आणि त्यामुळे गॅस तयार होण्याची आणि पाणी साठण्याची शक्यता वाढते. काही वेळा ओटीपोटाच्या भागात सूज येऊ शकते. PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) असल्यासही ओटीपोट फुगतं.
तिसरं कारण म्हणजे मानसिक तणाव. सतत तणावाखाली असणं, चिंता आणि असुरक्षिततेची भावना यामुळे शरीरात 'कोर्टिसोल' नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते. त्यामुळे पचनसंस्था मंदावते, गॅस तयार होतो आणि पोट फुगायला लागतं. तसेच, मेटाबॉलिझम कमी होते. ज्याचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर होतो.
काही वेळा गर्भाशय किंवा अंडाशयाशी संबंधित आरोग्य समस्या, जसे की फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, किंवा ओव्हेरियन सिस्ट्स यामुळेही ओटीपोटात वजन जाणवायला लागतं त्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. जीवनशैलीदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. बैठं काम, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, पाण्याचं प्रमाण, फास्ट फूड व प्रोसेस्ड अन्नाचा अति वापर हे सगळे घटक ओटीपोट फुगण्याला कारणीभूत असतात.
या सगळ्या कारणांचा विचार करता, ओटीपोट फुगण्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे. ही लक्षणं वारंवार जाणवत असतील, तर वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असतं. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि मानसिक आरोग्य सांभाळणं यामुळे अशा त्रासावर नियंत्रण मिळवता येते.